लाईन बाजार हनुमान मंदिराचा कलशारोहण, वास्तुशांती सोहळा
कसबा बावडा : ग्रामदैवत हनुमान मंदिराचा (लाईन बाजार) कलशारोहण व वास्तुशांती जगद्गुरू शंकराचार्य व भगवानगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. जीर्णोद्धारानंतर हिंदू समाजाच्या वतीने तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
बुधवारी किसन पडवळे यांच्या हस्ते पालखी पूजन होऊन पालखी व कलशाची ग्रामप्रदक्षिण झाली. यावेळी सागर यवलुजे, संजर लाड उपस्थित होते. प्रदक्षिणा मार्गाव अष्टेकर नगर, एकखांबी गणेश मंदिर शहाजी तरुणमंडळ वशिवचेंबर्सयांच्य वतीने अल्पोपाहाराची व्यवस्था केल होती. पालखी मंदिरात आल्यानंत भजन होऊन रात्री आतषबाजी करण्यात आली. गुरुवारी मंदिराच्या कलशाचे जगद्गुरू शंकराचार्य यांच्या हस्ते पूजन होऊन मंत्रोच्चारात कलशारोहण वास्तुशांती करण्यात आली. यावेळ प.पु.भगवानगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शंकराचार व भगवानगिरी महाराज यांचे प्रवचन झाले. त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील, माजी न्यायाधीश के.डी पाटील आदी मान्यवरांनी मंदिरास भेट देऊन ’श्रीं’चे दर्शन घेतले. शुक्रवारी मंदीर परिसरात भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. रात्री आतषबाजी करण्यात आली. कार्यक्रमास कमिटीचे अध्यक्ष सूर्यकांत तोडकर, हिंदु समाज सरपंच लक्ष्मण गायकवाड, चंद्रकांत घाटगे, आनंदराव जाधव, संजय शिंदे, आप्पासाहेब पडवळे आदींसह लाईन बझार मधील मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 295