साहित्य क्षेत्रासाठी संदीप देशमुख यांचे कार्य अतुलनीय - किशोर बळी
अंकुर साहित्य संघाकडून आयोजित वाढदिवस सोहळा
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
23 Jun 2025, 8:38 AM
अकोला : स्थानिक गणेश गार्डन येथील अंकुर साहित्य संघाच्या कार्यालयात आयोजित तरुणाई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा साहित्यिक पत्रकार श्री संदीप देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त छोटे खानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना अभिनेते गीतकार किशोर बळी म्हणाले की,अकोला जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात अतुलनीय कार्य करणारे श्री संदीप देशमुख हे परिणामाची चिंता न करता अखंड साहित्य सेवेत वाहून घेणारं व्यक्तिमत्व असून जिल्ह्यात विविध प्रकारचे साहित्य संमेलन घेण्यात आणि यशस्वी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. अकोला जिल्हा साहित्य संघाची संकल्पना व यशस्वी आयोजन करणारे ते एक आयोजक आहेत. त्यांनी अकोला जिल्ह्यातील नवोदित साहित्यिकांना हक्काचे विचारपीठ मिळवून दिले. कार्यक्रमात विचारपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोकस्वतंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय माणिकराव देशमुख, तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे माजी सदस्य पुष्प राज गावंडे प्रा. सदाशिव शेळके. किशोर बळी सत्कारमूर्ती वासुदेव खोपडे संदीप देशमुख आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय कावरे यांनी तर आभार यांनी मानले आभार धीरज चावरे यांनी मानले कार्यक्रमांमध्ये अंकुर साहित्य संघाचे सर्व शिलेदार अंकुर साहित्य संघाचे अध्यक्ष हिम्मत ढाळे तुळशीराम बोबडे शिवलिंग काटेकर प्रा. मोहन काळे अनिल डाहेलकर सुनील लव्हाळे सुनील दिवणाले प्रभाकर दिवनाले कांती शिर सागर प्रा. किरण वाघमारे अंबादास चांदुरकर राजाभाऊ देशमुख गजानन छबिले धीरज भोंडे प्रशांत भोंडे सुरेंद्र क्षीरसागर गोपाल मापारी. आदी साहित्यिक पत्रकारांची उपस्थिती होती.
Post Views: 72