ग्रामपंचायत विस्तारअधिकारी राजेश पांडुरंग पाटील यांच्या मनमानी कारभार ने तलासरी तालुक्यातील ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी झाले आक्रमक


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  28 May 2023, 10:13 AM
   

तलासरी -(संतोष घरत): तलासरी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजेश पांडुरंग पाटील यांच्या चाललेल्या मनमानी कारभाराबाबत तलासरी मधील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी दिनांक २२/५/२०२३रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन अध्यक्ष , पालघर व महाराष्ट्र ग्रामसेवक संघ अध्यक्ष पालघर यांना पत्रकार करून त्यांची इतर तालुक्यात बदली करण्याची मागणी केली आहे.
       तलासरी मधील ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांना तलासरी पंचायत समिती चे विस्तार अधिकारी राजेश पाटील हे तक्रारी नसताना वारंवार ग्रामपंचायतीच्या सखोल तपासण्या करून दमदाटी करणे.  मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दौ-याचे औचित्य साधून पैशाची मागणी करणे व ग्रामसेवक / ग्रा.वि.अ यांना अरेरावीची भाषा वापरणे. कार्यालयीन वेळे नंतर फोन करून मानसिक त्रास देणे.ग्रामपंचायत तपासणी नंतर अखर्चित रक्कम गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्या वैयक्तीक नावे चेक ची मागणी करणे.
  सरपंच/उपसरपंच/ सदस्य यांच्या समोर ग्रामसेवक / ग्रा.वि.अ. यांना अर्वाच्य भाषेत बोलुन मानहानी करणे,  नोटीसचा खुलासा दिल्या नंतर १ ते ३३ नमुन्याची छायांकीत प्रत ची मागणी करणे.  प्रशासक कालावधी मधील खर्चाची माहिती घेवुन अध्यक्ष यांच्या नावाने पैशाची मागणी करणे. ग्रामपंचायती कडील बीलाची कॉपी , रिसीट फाईल मधुन बाहेर काढून ब्लॅकमेल करणे. ग्रामपंचायत प्रशासकीय कामकाज करीत असताना कामात जाणीव पुर्वक अडचणी  निर्माण करणे. अशी  कृत्य विस्तार अधिकारी  राजेश पांडूरंग पाटील हे वारंवार करीत आहेत. तपासणी अधिकाराचा गैर वापर करतात. 
     विस्तार अधिकारी यांची इतर  ठिकाणी  बदली करणार नाही, तो पर्यत विस्तार अधिकारी यांना ग्रामपंचायत दप्तर तपासणी करता देणार नसून विस्तार अधिकारी यांच्या आढावा सभेला व विस्तार अधिकाऱ्यांला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नसल्याचे पत्रात नमूद केले आहे.
     तलासरी तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना होत असलेल्या मानसिक त्रासाची माहिती गटविकास अधिकारी यांना ही दिली होती. परंतु विस्तार अधिकारी मध्ये कोणताही बदल किंवा सुधारणा झाल्या नसल्याने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्यामध्ये प्रचंड तणाव व  असंतोष निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम कामकाजावर झाला असल्याचे ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी आणि तक्रारीत म्हटले असून ग्रामपंचायत विस्तार अधिकारी  राजेश पांडुरंग पाटील यांची पंचायत समिती तलासरी येथून तातडीने अन्य ठिकाणी बदली करून ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवक यांना न्याय मिळावा अशी विनंती केली आहे.
    तलासरी तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या तक्रारी अर्जावर मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद पालघर कोणती भूमिका बजावतात व काय कारवाई करतात याकडे  सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Post Views:  281


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व