दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  28 Oct 2022, 5:07 PM
   

अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर राबवले जात आहेत . दिव्यांग बांधवांच्या आरोग्याबरोबरच सामान्य जनतेलाही सुदृढ आरोग्य लाभावे ह्या हेतूने संस्थेतर्फे दि.31 ऑक्टोबर  ते ४ नोव्हेंबर २०२२ दरम्यान निशुल्क आरोग्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे . सदर कार्यशाळा सकाळी ६ ते ८ व संध्याकाळी ५ ते ७ या कालावधीत होणार असून दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे कार्यालय ,अपेक्षा अपार्टमेंट क्रमांक २ ,फ्लॅट क्रमांक ७ ,गणेश नगर , लहान उमरी अकोला येथे होणार आहे . छोट्या मुलांसोबत  वयोवृद्धांपर्यंत सर्वांना सदर कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे .वाढत्या वजनाला आळा घालणे , संतुलित आहार व फिटनेस वर या शिबिरात मार्गदर्शन केले जाणार आहे .औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध फिटनेस ट्रेनर सुवर्णा शेळके यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या या आरोग्य शिबिराला अकोलेकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या हेल्पलाइन ०९४२३६५००९० या  क्रमांकावर नोंदणी करावी असे आव्हान आयोजन समितीचे प्रा.विशाल कोरडे ,प्रा.अरविंद देव ,अनामिका देशपांडे ,विशाल भोजने ,अंकुश काळमेघ , विजयकुमार वनवे, सुजाता नंद ,पूजा गुंटीवार व श्वेता  धावडे यांनी केले आहे .

    Post Views:  148


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व