विशाल बोरे यांना आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्कार जाहीर


पुणे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलमध्ये होणार सन्मान
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  28 Nov 2024, 11:13 AM
   

अकोला : भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियान व भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव आयोजित मानाचा आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्कार दूरदर्शन वृत्तप्रतिनिधी तथा पिटीआय वृत्तप्रतिनिधी  विशाल प्रभाकर बोरे यांना जाहीर करण्यात आला असून पुरस्काराचे वितरण 2 ते 5 जानेवारी 2025 रोजी पुणे येथे होणाऱ्या देशातील पहिल्या फुले फेस्टिवलमध्ये  मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.विशाल बोरे यांनी दूरदर्शन प्रतिनिधी म्हणून पत्रकारीता क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोरोना काळात विशाल बोरे यांच्या मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील विविध प्रेरणादायी वृत्तकथांना देशभरात प्रसिध्दी मिळाली होती.ज्याची दखल घेत विशाल बोरे यांचा प्रसारभारतीच्या वतीने सन्मान करण्यात आला होता.
पत्रकारितेच्या माध्यमातून विशाल बोरे यांनी प्रेरणादायी,सकारात्मक विषयांना राष्ट्रीय पातळीवर पोहचवले आहे. तसेच भिडेवाडा देशातील मुलींची पहिली शाळा अभियानाबाबत सातत्यपूर्ण लिखाण केले आहे. याची दखल घेत विशाल बोरे यांना जाहीर करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाजरत्न पुरस्कारासाठी त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या पूर्वीही बोरे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या मूकनायक वर्तमानपत्राचे पहिले संपादक पांडुरंग नंदराम भटकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मूकनायक समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या मूकनायक पत्रकारिता पुरस्कार, सुट्टी बहुउद्देशीय संस्थेचा युथ आयकॉन पुरस्कार,कविवर्य जगदीश खेबुडकर युवासाहीत्य राज्य पुरस्कार, संताजी साहित्य, कला राज्य पुरस्कार,शब्दशोध साहीत्य पुरस्कार,महाराष्ट्र दलित साहित्य अकादमीचा राष्ट्रीय काव्यसाधना पुरस्कार, काव्यगौरव साहीत्य पुरस्कार, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा छत्रपती संभाजीराजे राष्ट्रीय साहित्य पुरस्कार, दैनिक लोकशाही वार्ताचा अकोलारत्न, पुरस्कारासह विविध राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

    Post Views:  5


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व