जलजीवन मिशन अंतर्गत निकृष्ट दर्जाचे काम! नानिवली येथे ठेकेदाराचा प्रताप..


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  13 Sep 2024, 10:43 AM
   

संतोष घरत- जिल्हा प्रतिनिधी 
पालघर | हर घर जल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महत्वकांक्षी योजनेचा बोजवारा उडालेला दिसून येत आहे. करोडो रुपयांचा ठेका देऊन निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कुणाचेच अंकुश नसल्यामुळे आज ठेकेदार गब्बर होत आहे तर कामं खराब होत आहेत.
मौजे नानिवली ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन अंतर्गत काम सुरू असून ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे आज दिसून येत आहे. तर हि योजना सुरू होण्याआधीच जर सिमेंट कॉंक्रीट दबल जात असेल तर हि योजना नेमकी किती वर्ष टिकणार आहे.
नानिवली ग्रामपंचायतीकडून या निकृष्ट दर्जाच्या कामाकडे दुर्लक्ष करत असून ठेकेदाराला जाणीव पूर्वक शह दिले जात असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. सदर  जल जीवन मिशन योजनेला करोडो रुपये खर्च करून जर असे निकृष्ट दर्जाचे काम होतं असेल तर सरकारचा करोडो रुपयाचा चुराडा तर होईल, परंतु तेथील ग्रामस्थ हे पाण्यापासून वंचित राहू नये ह्या करिता सदर बाबतीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने ह्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून  त्या ठेकेदारावर कारवाई करावी.

    Post Views:  136


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

संपादकिय

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted