प्रा. डाॅ. वासुदेव गोलाईत भारत शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  31 Jul 2024, 10:00 AM
   

अकोला - रियल इंडो ग्लोबल व्हिजन सोशियल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन धुळे या सुविख्यात शैक्षणीक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थेद्वारे दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना भारत शिक्षण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. संपुर्ण देशातुन अनेक अर्जांपैकी निवड समितीद्वारे सर्व निकष तपासुन त्यापैकी काहीच मान्यवरांची निवड केली जाते व त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने दरवर्षी सन्मानीत केले जाते. यावर्षी या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन २८ जुलै रोजी जी. बी. मुरारका महाविद्यालय शेगांव येथे केले. २०२४ या वर्षी प्रा. डाॅ. वासुदेव गोलाईत यांची उच्च शिक्षणात त्यांचे कार्य पाहून सदर  राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कारासाठी एकमताने त्यांची निवड करण्यात आली आहे. प्रा. डाॅ. वासुदेव गोलाईत हे एम.ई.एस. कला व वाणिज्य महाविद्यालय मेहकर येथे वाणिज्य विभागात प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. प्रा. डाॅ. वासुदेव गोलाईत यांनी आतापर्यंत अनेक महाविद्यालयांना नॅक संबधी रिसोर्स परसन म्हणुन मार्गदर्शन केलेले आहे, यामुळे अनेक महाविद्यालयांना ए प्लस ए व बी प्लस असे ग्रेड मिळालेले आहेत. ते विद्यापीठ मान्यताप्राप्त पी.जी. टिचर असुन पीएच.डी. पदवी मार्गदर्शक आहेत. व्यक्तीमत्व विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, बौध्दीक संपदा अधिकार, संशोधन पध्दती, संवाद कौशल्य विकास, ईंग्रजी भाषा विकास, संशोधन कार्य व त्याची उपयोगीता, नॅक मुल्यांकन विधी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व त्याची उपयोगिता अशा अनेक विषयांवर त्यांचे अनेक व्याख्याने विद्यार्थ्यांसाठी तसेच वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी  अनेक महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेली आहेत. 
आतापर्यंत त्यांची विद्यापीठ  वाणिज्य अभ्यासक्रमावर पाच पुस्तके प्रकाशित झालेली व हे सर्व पुस्तके अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहेत. तसेच त्यांची एडिटेट बुक अंतर्गत चार पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ते ऑल ईंडिया काॅमर्स असोसिएशन चे आजिवन सदस्य आहेत. डॉ.गोलाईत हे वाणिज्य अभ्यास मंडळ संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, सदस्य आहेत. यापुर्वी ते विद्यापीठ फॅकल्टी सदस्य होते तसेच महाविद्यालयात गुणवत्ता हमी समितीचे ते प्रमुख होते व त्यांच्या मार्गदर्शनात एम.ई.एस महाविद्यालय मेहकर या महाविद्यालयाला नॅक बी प्लस ग्रेड मिळालेले आहे. याबद्दल मेहकर एज्युकेशन सोसायटी च्या व्यवस्थापन मंडळाद्वारे त्यांचा भव्य सत्कार घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.
 त्यांचे विविध जर्नलमध्ये ३८ च्यावर लेख प्रकाशित असून त्यांनी ५० च्यावर राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग नोंदविला. त्यांनी मेहकर येथे नॅक या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केलेले आहे. डाॅ. गोलाईत यांना २०१८ मध्ये एज्युकेशनिष्ट आणि रिनाउंड रायटर अवार्ड, २०२० मध्ये प्रतिभा सम्मान अवार्ड तसेच २०२३ मध्ये को-चिफ एडिटोरीयल अवार्ड मिळालेला आहे. अनेक महाविद्यालयात त्यांच्या नॅक, सी.बी.सी.एस. व केंद्र सरकारचे नविन राष्ट्रीय शैक्षणीक धोरण याबद्दल केलेल्या मार्गदर्शनाबद्दल व सहकार्याबद्दल त्यांना अनेक वेळा सम्मानित करण्यात आलेले आहे. डाॅ. गोलाईत यांच्या या सर्व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना भारत शिक्षण रत्न पुरस्काराने सापत्निक व सहकूटुंब सम्मानित करण्यात आले. त्यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचे मेहकर एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाने तसेच प्राचार्य, स्टाफ यांच्या द्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच नातेवाईक, मिञ मंडळी यांच्या द्वारे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

    Post Views:  46


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व