देवेंद्र मेश्राम यांची पर्यावरण मित्र बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत च्या जिल्हा संघटक पदावर नियुक्ती


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  10 Jun 2024, 10:50 AM
   

पालघर -   लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राट्रीय संघटनेचे पालघर जिल्हा पदाधिकारी व‌ विश्वप्रभात वृत्तपत्र व न्यूज पोर्टलचे पालघर वृत्त प्रतिनिधी श्री.देवेन्द्र मेश्राम यांची पर्यावरण मित्र बहुउद्देशिय सामाजिक संस्था भारत या संस्थेच्या पालघर जिल्हा संघटक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 
        सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत.ते लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे ही जिल्हा पदाधिकारी असून  आधार सेवाभावी संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आहेत.त्यांची 
 पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत या संस्थेच्या पालघर जिल्हा संघटक पदी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय चोघळा सर,राष्ट्रीय उपाध्यक्ष पराग पाटील सर,राष्ट्रीय सचिव संगीता भेरे मॅडम,राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रदीप चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली.आपल्या भविष्यातील पर्यावरणीय वाटचालीस संस्थेच्या वतीने त्यांना मनस्वी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.याबध्दल  अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव,
कोषाध्यक्ष,आणि सर्व सभासदांचे मेश्राम यांनी आभार मानले.

    Post Views:  87


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व