महान तपस्वी स्व. बाळासाहेब उगले यांच्या तेरवीप्रित्यर्थ पंढरपूरातील गुरुदेव सेवा मंडळ पालखी व्यवस्थेसाठी ५१ लाखाच्या मुदती ठेवीच्या व्याजातून खर्चाचा निर्णय...!
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
02 Jun 2023, 12:17 PM
(विजय बाहाकर) :-अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचा सच्चा कार्यकर्त तसेच पंढरपूरच्या पहिल्या रामकृष्णहरी"वृद्धाश्रमाचे संस्थापक स्व.डॉ. लीलाधर उर्फ बाळासाहेब उगले हे वयाच्या ८३ व्या वर्षी आपल्या कर्तव्यभूमीत रविवार दि.२१ मे २०२३ विठ्ठल चरणी लीन झाले. त्यांच्या तेरवीदिनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे पूत्र डॉ. कैलास उगले यांनी स्वर्गीय वडिलांनी केलेल्या संकल्पांना पंढरपूरात जाणाऱ्या पालखीतील सेवेकऱ्यांच्या व्यवस्थेच्या खर्चासाठी रू.५१ लाखांचा निधी लगेच मुदती ठेवीमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी लगेच हा निधी ते मुदती ठेवीमध्ये वळता करणार आहेत.


त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थीचे विसर्जन गुरुकुंज आश्रम मोझरी येथे सकाळी पाच च्या प्रार्थनेनंतर किर्तनकार काळे महाराज, श्री भानुदास महाराज कराळे आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विधीवत विसर्जित केल्या.श्री उद्धव राव वानखडे यांनी सर्व तीर्थ कुंडात गंगा यमुना सरस्वती आदी भारतातील पवित्र अशा ३५ नद्यांचे आणि महाराजांनी आणून त्यांच्या कार्यकाळापासून लाखो लोकांच्या अस्थी या तीर्थकुंडात असल्याचे सांगितले.अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने आयोजित केलेल्या स्वर्गीय बाळासाहेब उगले यांच्यासाठी विशेष आयोजित शोक सभेत संस्थेचे सर्वाधिकारी सर्वश्री लक्ष्मणराव गमे साहेब जेष्ठ किर्तनकार काळेसाहेब, प्रकाशभाऊ वाघ, प्रकाशन विभागाचे भानुदासजी कराळे आणि इतर मान्यवरांनी स्वर्गीय बाळासाहेब यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. स्वर्गीय बाळासाहेब उगले यांचे चिरंजीव डॉक्टर कैलास उगले यांनी वडिलांच्या इच्छेनुसार गुरुदेव सेवा मंडळाच्या दरवर्षी पंढरीला येणाऱ्या वारकऱ्यांची व्यवस्था व्हावी म्हणून ५१ लाख रुपये मुदती ठेवी मध्ये टाकून आजन्म व्यवस्था करण्याचा संकल्प केला. बाळासाहेबांचे शोक सभेच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा न्यायाधीश काळेसाहेब, विजय बाहाकर , योगेश उगले अनिल उगले आणि परिवार तथा इत्यादी मान्यवर हजर होते. नातेवाईकांच्या आग्रहास्तव ज्येष्ठ कीर्तनकार काळे महाराज यांनी कोंढणपूर येथे अस्थि विसर्जनानंतर जहांगीरपुर येथील मारुती संस्थांनमध्ये तेथील पुरोहितांच्या त्यांच्या हस्ते पूजन व विधी पार पाडला. या संस्थांनचे वैशिष्ट्ये असे की हा येथील मारुती हेमा मालिनी यांच्या स्वप्नात जाऊन माझ्या भेटीला ये असे सांगितले. हे गाव हेमामालिनीला माहीत नसल्यामुळे त्यांनी अमरावतीचे फिल्म डिस्ट्रीब्यूटर राठी यांच्याशी संपर्क साधून कीर्तनकार काळेसाहेब यांच्यामार्फत हेमामालिनीचे दर्शन घडविले. सकाळी दहा वाजता सर्वाधिकारी गमे साहेब यांनी रस पोळीचे सर्वांना सूरुची भोज दिला. भानुदासजी कराळे यांनी विशेष परिश्रम घेतले.दोन वेळची मीठ भाकरी मिळत नाही अशांना दवाखान्याचे बिल कसे परवडणार? अशा दीनदुबळ्या गरिबांनाची व्यथा पाहून दसरा मैदान नवाथेनगर बडनेरा रोड अमरावती येथील सरकारी हॉस्पिटल मधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून त्यांनी बहुउद्देशीय संस्था स्थापन करून ८५ च्या वर धर्मार्थ दवाखाने महाराष्ट्र भर दवाखाने स्थापन करून रुग्णसेवेला सुरुवात केली. वडील शिस्तीचे भोक्ते नोकरी सोडल्यामुळे वडिलांच्या आणि नातेवाईकांच्या रोशाला बळी पडावे लागले. त्याकाळात पंढरपूर वारीतील वारकऱ्यांना अमरावती वरून येऊन सेवा देणे खूप कठीण काम होते. पण त्यांनी दरवर्षी निःशुल्क सेवा दिली. त्यामुळे आजही त्यांच्या घराण्याला आषाढी एकादशी दर्शन पास व पहिल्या पाच दिवसात नैवेद्याचा मान मिळतो.
राष्ट्रसंतांना ग्रामगीता लिहिण्याची प्रेरणा पंढरपुरातच चंद्रभागे तिरी झाली आणि त्यांनी खंजिरी शेवटच्या भजनात पंढरीतच ठेवली. संत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता वारकरी व शेतकऱ्यांपर्यंत जावी म्हणून त्यांनी पंढरपूर मध्ये मठ स्थापन केला. एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी स्वतःच्या मुलांनी आई-वडिलांनी पंढरपूरला किंवा इतर ठिकाणी सोडून दिलेल्या वृद्धांसाठीपंढरपुरात पहिला वृद्धाश्रम स्थापन केला आज त्यांचे चिरंजीव डॉक्टर कैलास जी उगले आणि ट्रस्टी वृद्धाश्रम चालवतात.
गाडगेबाबा प्रमाणे डॉक्टर बाळासाहेब उगले यांनी स्वतःच्या कुटुंबाकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यांच्या तीनही मुलांचे आणि मुलीचे शिक्षणापासून ते त्यांच्या पायावर उभे करेपर्यंत त्यांच्या धर्मपत्नी स्व. डॉक्टर कुसूमताई बाळासाहेब उगले यांनी केले. पण त्यांच्या वृद्धापकाळात शेवटची 13 वर्ष डॉक्टर कैलास उगले, आणि कुटुंबातील सदस्यांना पंढरपूरला स्थायिक झाल्यामळे प्रेमळ सहवास मिळाला. त्यांनी अपंगांना अनेक प्रकारचे साहित्य पुरवून भरपूर मदत केली. त्यांनी आपल्या कार्याचा कधीही गवगवा केला नाही रुग्णसेवा हीच मानवता सेवा समजून सेवा केली. ते सेवावृत्ती संस्थांना दीपस्तंभ सारखे प्रेरणादायी होते. विदर्भाच्या गाडगेबाबांने पंढरपूर शहरात खूप मोठे नाव कमावले. त्यांचे सुपुत्र आणि सून यांचे सुद्धा खुप मोठे नाव आहे. डॉक्टर बाळासाहेब यांचा स्वभाव दुरदूष्टी, शांत, संयमी, धीरोदात्त, दाणी वूत्ती ,स्पष्ट वक्तेपणा होता. स्वर्गीय डॉक्टर बाळासाहेब उगले एक चालतं बोलतं व्यासपीठ होतं. आजही त्यांच्या स्वतःच्या मठात हजारो वारकरी आषाढी एकादशीला मुक्कामी असतात. अशा या महान तपस्वी ज्येष्ठ शुद्ध २, शके १९४५ रविवार दिनांक २१ मे २०२३ ला सकाळी १० वाजून १७ मिनिटांनी विठ्ठल चरणी लीन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले डॉक्टर कैलास,अमर, योगेश,मुलगी प्रा.वनिता काळे(उगले)२भगिनी श्रीमती वेणूताई चौखंडे आणि श्रीमती इंदुताई हरिनारायण रेंघे, भाची ज्योती विजय बाहाकर, अनेक नातेवाईक, अनेक ट्रस्टी, खूप मोठा आप्त आणि मित्रपरिवार आहे. त्यांच्या निधनाने खूप मोठी पोकळी निर्माण झाली असून ईश्वर यांना चिरशांती देऊन सर्व आप्तेष्टांना या संकटातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो.
Post Views: 239