तुकईवाडीत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
04 Aug 2023, 11:52 AM
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुकईवाडी येथील लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुभाषजी कोरडे यांनी प्रतिमेचे पूजन केले व सुभाषजी गाढवे यांनी पुष्पहार अर्पण केले . केंद्राच्या केंद्रप्रमुख कल्पना टाकळकर यांनी विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळकांविषयी माहिती सांगितली
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती बाबत विद्यार्थ्यांना यूट्यूब द्वारे पोवाडे व त्यांच्या वाड़्मया विषयी माहिती दाखवण्यात आली. प्रसिद्ध लावणी माझी मैना गावामध्ये राहिली ऐकविण्यात आली. इयत्ता पहिलीचा विद्यार्थी शिवांश गाढवे, दुसरी कृष्णाई कोरडे, तिसरी ओवी हांडे व साद लातूरे यांची भाषणे झाली. कार्यक्रम प्रसंगी संतोष कोरडे, राहुल कोरडे,यशवंत कोरडे,दक्षता कोरडे उपस्थित होत्या. कार्यक्रमास खेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अमोलजी जंगले,खेड बीटचे विस्ताराधिकारी ज्योती चिलेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक विजयकुमार शेटे व व्यवस्थापन निलम आढारी यांनी केले.
Post Views: 682