पद्मश्री पद्मजा फेणाणी यांचे हस्ते अकोल्याचे सी. ए. तुषार तल्हार यांचा सत्कार
अकोला - आठवणीतील कुसुमाग्रज या ग्रंथाच्या लिखाणात मोलाचे सहकार्य केल्याबद्दल अकोला येथील युवा सी. ए. तुषार अंबादास तल्हार यांचा स्वरचंद्रिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचे हस्ते नाशिक येथील एका शानदार समारंभात सत्कार करण्यात आला. नाशिक येथील साप्ताहिक कुसुमाग्रज नगर यांचे तर्फे आठवणीतील कुसुमाग्रज या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कविवर्य कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा ग्रंथ महाराष्ट्रातील 60 लेखकांनी आपल्या अनुभवातून लिहिलेल्या कुसुमाग्रजांच्या आठवणी मधून तयार करण्यात आला आहे. याकरिता अकोल्यातील युवा सी. ए. तुषार तल्हार यांचे सुद्धा योगदान लाभले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल या ग्रंथाचे संपादक रामदास नागवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सत्कार सोहळा घडवून आणला. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रख्यात गायिका स्वरचंद्रिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचे हस्ते अकोल्यातील या युवा सी. ए. चा सत्कार व्हावा ही निश्चितच अभिनंदनीय व कौतुकास्पद बाब आहे.
Post Views: 34