कवी विश्वासराव देशमुख यांना संत सोपानदेव ग्रामगीता पुरस्कार जाहीर


संत विचार, जीवनमुल्यांच्या सागरातून प्रसवलेल्या जागृतीपर भावस्पर्शी साहित्याचे झाले यथायोग्य मुल्यमा
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2023-11-08
   

अकोला- कवी विचार मंच शेगांव यांच्या वतीने शेगांव येथील कवी संतोष उर्फ  विश्वासराव देशमुख(निंबेकर ) यांना २०२३ चा संत सोपानदेव ग्रामगीता पुरस्कार  लोककवी विजय पोहनेरकर, कवी हरिदास कोष्टी, लेखक संदीप राक्षे, कवी शिवशंकर चिकटे, कवयित्री अलका बोर्डे, गायक नरेंद्र जकाते या निवड समितीने  जाहीर केला आहे. श्रीक्षेत्र आपेगाव येथे होणा-या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात महंत भास्करगिरी महाराज देवगड संस्थान यांच्या शुभहस्ते शनिवार दि २५ नोव्हेंबर २०२३ रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

 पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कवी विश्वासराव देशमुख यांनी उलगडलेले त्यांचे संत आणि साहित्य सेवेतील भावविश्व..!
आम्ही आपुल्यासाठी मरतो ।
देव सकळांसाठी कार्य करतो।
हाचि भाव त्याने स्फुरतो ।
म्हणोनि धरिला देव चित्ती ।।
                      ग्रामगीता
आवड व कार्य  बाल अवस्थे पासूनच आध्यात्म संत विचार धारेसी आणि ग्रामीण गावगाढ्याशी  ज्यांची नाळ जुळलेली आहे असे एक असामान्य जीव म्हणजे विश्वासराव बालपणापासूनच देवधर्म व आध्यात्म, संत विचारधारेवर वाटचाल. वाचन, हरीपाठ, प्रार्थना, काकड आरती, कीर्तन, भागवत व इतरांच्या सुख,दुःखामध्ये त्यांचा हिरीरीने सहभाग होता. तो परिपाठ आजतागायत सुरू आहे.. 
       प्राथमिक शालेय जीवनात  वयाच्या १० व्या वर्षी जवळच एका खेडे बहादुरा या गावी नाटक पहायला गावकर्‍यां सोबत गेलो व तिथेच व्यासपिठावर पहिले पाऊल पडले ते गीत सादरीकरणाचे.वयाच्या ११ व्या वर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन मंडळात प्रवेश केला.व शालेय प्रत्येक कार्यक्रमात देशभक्तीपर गीत गायणात समावेश झाला.त्यात इयत्ता १२ वी पर्यंत यात माघारच नाही. मग १५ ऑगष्ट असो,२६ जानेवारी असो वा महाराष्ट्र दिन... थोर पुरूषांच्या जयंती वा पुण्यतिथी,व राष्ट्रीय कार्यात व सर्वच सेवाभावी  कार्यक्रमात सहभाग असायचा.तसेच वर्ग ५ मध्ये असतानांच एक होता बैरागी,पंपुशेठ अशा एकांकी नाटीका सहभाग,वर्ग ७ वी मध्ये असतांना बेपत्ता ३ अंकी नाटक. वर्ग ८ वी मध्ये पूनर्जन्म नाटक ३ अंकी व सांस्कृतीक कार्यात सहभाग असायचा. तसेच शिक्षण विभागात नौकरीत असतांना हिवरखेड(रूप)येथे मोरूची मावशी ३ अंकी तुफान विनोदी नाटक यात नायक हे भैयाचा अभिनय पात्र सादर केलेत. तसेच महाराष्ट्र शासन सांस्कृतीक भजन समूह कार्यात निवड व भंडारा,तुमसर,व नागपूर हिंगणा येथे सांस्कृतीक भजन अविष्कारपत्र प्राप्त.संगीताची मुळातच आवड व संगीताच्या तीन परिक्षा पास.सेवानिवृत्ती नंतर सोशल मिडीयाच्या  माध्यमातून वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची लिखीत "ग्रामगीता" लोकांपर्यंत महाराष्ट्रभर प्रचार व प्रसार सेवाकार्य, तथा सन२०१९ ते २०२२ पर्यंत गु.से.मंडळ बाळापूर तालूका उत्कृष्ठ प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली. सन २०२३ पासून अकोला जिल्हा गुरूदेव सेवा.मंडळ,गुरूकुंज मोझरी आश्रमाअंतर्गत कार्यकारणी सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.तसेच सामाजिक ,धार्मिक व लोकहितार्थ कार्यात हरीरीचा सहभाग.अशातच संत नगरी शेगाव येथे वास्तव्यास असल्याने माझे पूर्वीचेच जीवलग मित्र आदरणीय विनायकरावजी चिकटे व त्यांचेच चिरंजीव कवी विचार मंच शेगाव चे संस्थापक अध्यक्ष शिवशंकरजी चिकटे यांचे सहमतीतून या समूहात प्रवेश व आज महाराष्ट्रभर जिल्ह्या जिल्ह्यात कवी,कवयित्री यांचा रक्ताच्या नात्यापलिकडचे भावकी प्रेम संबंध जोपासत आहो.या समुहामुळेच एक हजारचे वर रचना लिहीण्याची संधी मिळाली त्यात भावगीत,भक्तीगीत, हाश्य कवीता, कवीता,अभंग, पोवाडा, देवी गोंधळ, जोगवा, लावणी असे कितीतरी प्रकारचे विषय हाताळत असतांना माझ्यावर खरी कृपा संतांची व राष्ट्रसंतांचीच की त्यांनी सातत्याने साहित्य क्षेत्रात मला इतपर्यंत आणून पोहचवले.खरं म्हणजे माझ्या स्वप्नातसुध्दा नव्हते की आपण गुरूदेव सेवा मंडळाचे तालुका प्रचार प्रमुख होऊ. पण ही संतांचीच कृपा घरबसल्या पद व अधिकार मिळाले.कारण माझा स्वभाव असा आहे की,फक्त निष्काम कार्य करत राहणे.महाराज म्हणतात...
खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा ।
झटू सर्वभावे करू स्वर्ग गावा ।
कळो हे वळो,देह कार्यी पडू दे ।
घडू दे प्रभो ! एवढे हे घडू दे ।।
हे संतांचे शब्दबोल अंगाकारून चालत राहिलो.पुढे
वं.महाराज म्हणतात.
सेवाकार्यासि वाहून घ्यावे ।
आध्यात्मभावा अनुभवित जावे।
आणिकासही धडे ध्यावे ।
शिकवावा सेवाभाव ।।
वरील ओवीप्रमाणे कार्य करीत रहावे.ग्रामगीतेने जीवनात मला खूप काही दिले म्हणुनच तिचे आणि माझे नाते एवढे जवळचे झाले की,
ग्रामगीता माझे ह्रदय ।
त्यात बसले सद्गुरूराय।
बोध त्यांचा प्रकाशमय ।
दिपवोनि सोडील ग्रामासि ।।
एवढी ताकद संताच्या शब्दात आहे म्हणुनच संतांच्या विचारधारेवर चालणे, श्रध्दाभाव ठेवणे,व तसे स्वतः आचरण करणे. ज्या ग्रामगीतेने समाजात एवढा सन्मान दिला. सद्भाव दिला, समाजाशी प्रेमाचे नाते जोडले, मोठ केल, वाचेत शक्ती दिली ती ग्रामगीतेनेच हाच माझ्या जीवनाचा परिचय राहिला..

    Post Views:  234


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व