24 तास कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना राखी बांधून दिव्यांग सोशल फाउंडेशन तर्फे रक्षाबंधन साजरे
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
31 Aug 2023, 10:15 AM
अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या माध्यमाने प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक कार्य संपूर्ण भारतभर राबवले जात आहेत . दि.30 ऑगस्ट २०२३ रोजी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला व दिव्य ज्ञान महिला बहुउद्देशीय विकास संस्था अकोलाच्या संयुक्त आयोजनात 24 तास कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या राख्या बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले . राखी दिव्यांगांची भावना कृतज्ञतेची ह्या उपक्रमात मुख्य पोस्ट कार्यालय , अकोला बस स्थानक व सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथील कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांसह रक्षाबंधनाचा हा वैविध्यपूर्ण कार्यक्रम अकोलेकरांसाठी कौतुकाचा विषय ठरला आहे . या सर्व कर्मचाऱ्यांना राख्या बांधल्या त्यांच्यासह आनंदाचे क्षण व्यतीत केले त्यांचे प्रश्न कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी या विषयावर चर्चा करण्यात आली त्यांना मिठाई व भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान संस्थेतर्फे करण्यात आला . रक्षाबंधनाच्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात संस्थेच्या इव्हेंट मॅनेजर अनामिका देशपांडे , सदस्य अस्मिता मिश्रा , नेहा पलन व प्रतिभा काटे यांनी सहभाग नोंदवला . सदर कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना येणाऱ्या अडचणी सुद्धा या कर्मचाऱ्यांनी ऐकून घेतल्या व त्यांना सदैव मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी राख्या बांधल्यावर सर्व कर्मचारी भावुक झाले होते.त्यांनी संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले अशा समाजसेवी संस्थेला समाजाने सहकार्य करावे असे आवाहन अभय कुलट , दिलीप नालींदे , दीपक कपले , संतोष हागे व कपिल तिवारी यांनी केले .
Post Views: 85