महिलांना हक्काची जाणिव होणे गरजेचे... जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे


 संजय एम.देशमुख  09 Mar 2023, 3:09 PM
   

उरुळीकांचन: घटनेमुळे महिलांना समानतेचा, स्वातंत्र्याचा, धार्मिक स्वातंत्र्याचा, शिक्षण व संस्कृती संवर्धनाचा तसेच  संविधान रक्षण करण्याच्या अधिकार महिलांना प्राप्त झाला . महिला प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. मात्र प्रत्येक महिलेला आपले ध्येय साध्य करण्याची संधी प्राप्त होत नाहीं. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. ह्यामुळे महिलांना खूप परिश्रम ह्यावे लागतात, बालसंगोपना शिवाय कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.अश्या वेळी महिलांना त्यांच्या हक्काचि जाणिव होणे गरजेचे असते, असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे ह्यांनी येथे व्यक्त केले. महिला दिनाचे औचित्य साधून येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ह्या वेळी मार्गदर्शन करताना  पद्मश्री डॉ मणीभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट नीती आयोग भारत सरकार सलग्नित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ रविंद्र भोळे ह्यांनी वरील मत व्यक्त केले. ह्याप्रसंगी काही निवडक महिलांना सन्मानीत करण्यात आले.डॉ अपूर्वा रविंद्र भोळे हीचा सौ शैलजा रमेश चौधरी ह्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला सौ नलिनी एकनाथ चिरमाडे,सौ पुनम तोषक  चौधरी, सौ सुवर्णा विजय वारके, सौ शैलजा रमेश चौधरी तसेच अस्मिता महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या संचालिका सौ संगीता रविंद्र भोळे व परिसरातील बहुसंख्य महीला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

    Post Views:  142


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व