महर्षी कर्वे शिक्षण विद्यापीठातील हायस्कूलमध्ये संगणक कक्षाचे उद्घाटन
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
2024-10-04
पुणे - महर्षी कर्वे शिक्षणविद्यापीठ हायस्कूल प्रशालेमध्ये नवीन संगणक कक्षाचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एक्सप्लिओ सोल्युशन लिमिटेड कंपनीचे सीईओ प्रसादजी सटकर व सी. एस. आर. प्रमुख सत्यजित पाटील, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्रजी देव, विद्यापीठ हायस्कूल शाला समिती अध्यक्षा सीमा कांबळे , सचिव डॉ.पी. व्ही.एस शास्त्री, उपसचिव प्रदीपजी वाजे , कंपनीचे इतर मान्यवर विकास गुप्ता ,संदीप पाटील ,वर्षा राऊत, विजया बराटे, वैशाली पोतदार,सी एस आर समन्वयक सुवर्णा ढमढेरे, पल्लवी बसाळ, प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापक विष्णू मोरे यांनी केला. प्रमुख पाहुणे प्रसादजी सटकर यांनी सक्षम तंत्रज्ञानाने समृद्ध पिढी घडावी असे सांगितले, तर सत्यजित पाटील यांनी नवीन संगणक वर्गाचा जास्तीत जास्त उपयोग विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी करावा असे सांगितले. संस्थेचे या कंपनी सोबत असलेले ऋणानुबंध असेच रहावेत असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्रजी देव यांनी केले . संगणक वर्गाबद्दल मनोगत विद्यार्थी चैतन्य मगर व शिक्षिका वैशाली सैंधाने यांनी केले. एक्सप्लिओ सोल्युशन लिमिटेड या कंपनीतर्फे सी एस आर फंडांतर्गत २१,१०,०७०/ रुपयाची देणगी संगणक वर्गासाठी देण्यातआली. कार्यक्रमाचे आभार गौरी गोळे यांनी मानले तर सूत्रसंचालन स्नेहा वाघमारे यांनी केले.
Post Views: 119