पत्रकारांवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ संघटनेचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना निवेदन प्रकरणी निषेध !
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
03 Jan 2023, 7:12 PM
स्वप्निल देशमुख : बुलढाणा :- संग्रामपूर तालुक्यातील एमसीएन न्यूज मराठी चे ब्युरो चीफ व युवा मराठा न्यूज चे विशेष प्रतिनिधी व विश्वप्रभात चे तालुका प्रतिनिधी तसेच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे सदस्य ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांच्यावर तामगाव पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून त्यांचेवर दबाव आणण्याचा प्रयत्नातून अन्याय केला आहे.ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
पोलीस स्टेशन तामगाव तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा यांचे आशीर्वादाने सुरू असलेल्या अवैध धंद्यांच्या बातम्या प्रकाशित केल्या होत्या. तसेच तामगाव पोलीस स्टेशनचे काही अधिकारी यांच्या आशीर्वादाने तामगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांना ऊत आला असून त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे व महिलांचे जगणे देखील मुश्किल झाले आहे. मात्र चिरीमिरी घेऊन सदरच्या धंद्यांना तामगाव पोलीस स्टेशनचे पाठबळ आहे त्यामुळे पोलिसांनी षड्यंत्र रचून सुदबुद्धीने पत्रकार ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांचे विरुद्ध अपराध क्रमांक 389/ 2022 हा खोटा गुन्हा दाखल केला व त्यात अर्थार्थी संबंध नसताना ज्ञानेश्वर पाटील यांना गोण्यात आले आहे त्याबद्दलचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ज्ञानेश्वर पाटील दांदळे हे अपराधातील नमूद घटना, तारीख व वेळ यावेळी त्यांचे राहत असलेल्या वरवट बकाल येथील किरायाच्या घरामध्ये हजर होते व तेथे सदर बिल्डिंगच्या सुरक्षे करिता लावलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेज मध्ये निदर्शनास येते व सिद्ध होते तसेच याबाबतचा अर्ज देखील अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांना दिनांक 21 डिसेंबर 2022 रोजी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिनांक 24 डिसेंबर 2022 व पोलीस स्टेशन तामगाव येथे चौकशी अधिकारी यांना दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी देण्यात आला मात्र इतके दिवस होऊन सुद्धा सीसीटीव्ही फुटेज जमा करण्याची कारवाई देखील पोलिसांमार्फत करण्यात आली नाही. तसेच वेळेच्या आत सदरचे सीसीटीव्ही फुटेज जमा न केल्यास कॅम्पुटर प्रणालीद्वारे आपोआप नष्ट होतील व ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांचा निर्दोष असल्याचा पुरावा देखील नष्ट होईल. तरी लवकरात लवकर निष्पक्ष चौकशी करून ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांच्यावर दाखल असलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे करिता लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय देशमुख, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष श्री स्वप्निल देशमुख यांनी याबाबत दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी निवासी उपजिल्हाधिकारी श्री दिनेश गीते यांच्यासोबत चर्चा करून याबाबत कारवाईची मागणी केली आहे. निवेदनासोबतच त्यांना लोकस्वातंत्र्यची दिनदर्शिका भेट देण्यात आली.यावेळी त्यांचेसोबत केंद्रीय सचिव श्री राजेन्द्र देशमुख,सहसचिव श्री विजय देशमुख व मार्गदर्शक पदाधिकारी श्री पुष्पराज गावंडे हे सुध्दा उपस्थित होते.जिल्हा अधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे पत्रकार दांदळे यांचेवर झालेल्या अन्यायाबाबत निषेध करण्यात आला.
पत्रकार खासगी कामासाठी नव्हे, तर समाजाच्या प्रश्नांसाठी पोलिस स्टेशन मध्ये जातात. पत्रकारांना तेथे उद्धट वागणूक मिळत असेल व खोटे गुन्हे दाखल केले जात असतील, तर ही बाब दुर्दैवी आहे. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे.
पत्रकारिता करणं गुन्हा आहे का? :- स्वप्निल देशमुख
या प्रकरणाची दखल घेऊन खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली.
Post Views: 336