आदर्श विद्यार्थ्यांचा आदर्श शिक्षकाच्या हस्ते सत्कार....
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
17 Sep 2022, 2:26 PM
हिंगणघाट (किशोर मुटे) : अल्लीपुर येथील अभ्यासू शेतकरी श्री.सतिशजी चंदनखेडे यांचा मुलगा ची.नयन याने NEET या परीक्षेत गगन भरारी घेत ७२० पैकी ६३१ मार्क घेऊन गावाचा नवा इतिहास रचल्या बद्दल गावातील आदर्श शिक्षक व सर्वांचे प्रेरणास्त्रोत असलेले माजी सरपंच गजुभाऊ नरड यांचे हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देत त्याचा व परिवाराचा सत्कार करण्यात आला,ची.नयन हा सामान्य कुटुंबात जन्माला आला,आई-वडील हे व्यवसायाने शेतकरी,शेती हा खरोखर तोट्याचा व्यवसाय आहे याची जाणीव त्याला झाली, या जाणिवेतून नयन याने कठोर मेहनत घेत जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवला आणि आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं,नुकताच पार पडलेल्या NEET च्या निकालात सुद्धा त्याने मोठी गगन भरारी घेतली आहे,नयनला एक चांगल डॉक्टर व्हायचं आहे,त्यातून सामाजिक सेवा करण्याचं त्याच एक व्रत आहे,त्याला पुढील वाटचालीस यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सचिनजी पारसडे,नितीन सेलकर,विकास गोठे,मयूर डफ,निशांत लांभाडे,श्रुनय ढगे, रोषण नरड,ऋषिकेश कोमुजवार,आकाश घुसे,प्रज्वल डफ,हे उपस्थित होते, या यशामागचे श्रेय त्यानी आपल्या आई-वडिलांना दिले आहे...
Post Views: 213