अकोला जिल्हा देशमुख समाजाची कार्यकारिणी अविरोध घोषित


आमसभा शांततेत संपन्न
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2022-08-27
   

अकोला :      अकोला जिल्हा देशमुख समाज सेवा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मिलन सभागृह महसूल कॉलीनी येथे नुकतीच शांततेत संपन्न झाली.जिल्हाध्यक्ष कृष्णराव देशमुख,डोंगरगावकर यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत उपाध्यक्ष विश्वासराव देशमुख, के.व्ही देशमुख, सहसचिव संजय देशमुख, सौ.कविताताई ढोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सर्वप्रथम दिप प्रज्वलन करून संत भैय्युजी महाराज व समाजभूषण भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख यांना हारार्पण आणि वंदन करण्यात आले.दिवंगत उपाध्यक्ष स्व.भास्करराव देशमुख घुंगशीकर व नागोराव देशमुख,रिधोरेकर तसेच देशमुख जागृती मंडळाचे पदाधिकारी अश्विन देशमुख यांच्या मातोश्री श्रीमती सत्यभामा बाई देशमुख व मंडळाच्या ईतर सर्व दिवंगत सभासदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. 

मंडळाचे पदाधिकारी के.व्ही देशमुख यांनी कार्यकारिणी निवडीच्या घटनात्मक प्रक्रियेबाबत माहिती दिली.सहसचिव संजय देशमुख यांनी कार्यकारिणी निवड प्रक्रीया सुरू करण्यापूर्वी मागील 15 मधून 11 सभासदांचे बहूमत असतांनाही सचिव मधुकरराव देशमुख यांनी निर्माण केलेल्या नियमबाह्य अडचणी आणि असहकारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली.त्यामुळे पाच वर्षांपासून रखडलेल्या नुतन कार्यकारिणीचे काम पूर्ण करण्यासाठी घटनात्मक पध्दतीने घेतलेली ही वार्षिक सर्वसाधारण सभा असल्याचे यावेळी सांगीतले. यानंतर कार्यकारिणीत समावेशासाठी 17 सभासदांची नावे सुचक अनुमोदकांनी  सुचविली. त्याला आवाजी प्रतिसादाने अनुमोदन देण्यात आल्यानंतर तयार झालेली नवीन अविरोध  कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.जुण्या पदाधिकार्‍यांचे ऋणनिर्देश व्यक्त करून स्वागत करण्यात आले, तर मावळते अध्यक्ष के.एम.देशमुख यांचा यावेळी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विश्वासराव देशमुख व प्रा.संजयराव देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली, तर के.एम.देशमुख यांनी नुतन कार्यकारिणी पदाधिकार्‍यांचे अभिनंदन करून भावी कार्याला शुभेच्छा व्यक्त केल्या.मिलन कार्यालय सभेसाठी उपलब्ध करून देणार्‍या दिलीपराव देशमुख,बेलूरेकर यांचाही शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या सभेला धारेराव देशमुख, प्रदिपराव देशमुख, मुकुंदराव देशमुख, वसंतराव देशमुख, राजाभाऊ देशमुख, विठ्ठलराव देशमुख, सुनिल देशमुख, व्हि.डब्ल्यू. देशमुख, कविताताई ढोरे, सौ.नयना देशमुख, सौ.कल्पना देशमुख, सौ.राजश्री देशमुख, जागृती मंडळाचे अध्यक्ष संजय कृष्णराव देशमुख, अनिलराव वानखेडे, राजाभाऊ देवीदासराव देशमुख, नितीन देशमुख, प्रा.संजय देशमुख, योगेश देशमुख, हरिष देशमुख, अंकूश तंवर, यशवंत देशमुख, विजयराव देशमुख, अशोकराव देशमुख, केशवराव देशमुख, बाबूजी देशमुख, के.के. देशमुख, सुजय देशमुख, ईश्वरचंद देशमुख, सुभाषराव देशमुख, राजेन्द्र पंजाबराव देशमुख, दिलीपराव देशमुख, अरविंद देशमुख व बहूसंख्य सभासद उपस्थित होते. आभारप्रदर्शन प्रा.संजयराव देशमुख यांनी केले.

    Post Views:  1303


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व