श्यामा प्रसाद मुखर्जी थोर राष्ट्रभक्त होते....समाजसेवक डॉ रविंद्र भोळे


 संजय देशमुख  2022-07-10
   

पुणे :मानवतेचे उपासक,सिद्धांतवादी,महान राज नितीतज्ञ,राष्ट्रीय एकतेचे प्रखर पुरस्कर्ते ,महान राष्ट्रीय चिंतक ,शिक्षावादी ,राष्ट्राचे महानायक,डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी थोर देशभक्त राष्ट्रभक्त होते. असे मत जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे यांनी व्यक्त केले.डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय विचार मंच दिल्ली अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश शाखेच्या वतीने डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मार्गदर्शन करताना डॉ रविंद्र भोळे पुढे म्हणाले की,डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी समर्पित कार्ये करुन नव राष्ट्र निर्माण करण्यासाठी परिश्रम घेतले.श्यामा प्रसाद मुखर्जी ह्यांचे राष्ट्रीय कार्य जनमानसात पोहोचविनणे व समर्पित भावनेने राष्ट्रहितासाठी झटत राहण्यातूनच म्हणजे श्यामा प्रसाद मुखर्जी यांची खरी जयंती साजरी होईल ,
            महान विभूती, युग पुरुष,महान राष्ट्रनायक, भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदिजी यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या विचारसरणीला खुप महत्व दिले आहे.ह्या प्रसंगी डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय विचार मंचाच्या पदाधिकारी सौ किरण पाचपांडे महिला प्रकोष्ट निगडी पुणे,राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गंगाधर पाटील (उपाध्यक्ष वर्धा),डॉ डि एन पाटील नागपूर, डॉ सलिल पाटील, (उपाध्यक्ष पुणे)डॉ अशोक नारखेडे नाशिक,डॉ रविंद्र चौधरी डॉ शेवंतीलाल दोषी,बारामती,व पुण्यातील अविनाश हळबे,डॉ एल झेड पाटील राजू परदेशी ,हनुमंत वल्लिपूरे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

    Post Views:  423


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख