सोलापूर - महिलांबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या व वारकरी संप्रदायाला बदनाम करणाऱ्या ह.भ.प. बंडातात्या कराकडकर यांची वारकरी संप्रदायातून वारकऱ्यांनी हकालपट्टी करावी. कराडकर यांना पंढरीत पाऊल ठेवू देणार नसल्याचा इशारा सोलापर आणि पंढरपूर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने देण्यात आला आहे.
बंडातात्या यांनी केलेले वक्तव्य अतिशय निंदनीय असून, संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांचा हा अपमान आहे. वारकरी संप्रदायाला बदनाम करणाऱ्या अशा विकृतीला वारकरी संप्रदायामधून हाकलून द्यावे. कराडकरांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष श्रीया भोसले यांनी पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रम कदम यांना दिले आहे.
यावेळी ओ. बी. सी. महिला जिल्हाध्यक्ष साधना राऊत, महिला जिल्हा कार्याध्यक्ष रंजना हजारे, पंढरपूर महिलाध्यक्ष संगीता माने, युवती शहराध्यक्ष हर्षाली परचंडराव, महिला जिल्हा उपाध्यक्ष सारिका साबळे, पंढरपूर शहर कार्याध्यक्ष सुनंदा उमाटे, पंढरपूर युवती तालुकाध्यक्ष ऋतुजा चव्हाण, पंढरपूर युवती शहर सचिव श्वेता देशपांडे, विद्यार्थी सेलच्या अमृता शेळके, शहर उपाध्यक्ष गिरीश चाकोते, शहर सचिव सचिन आदमिले, युवक तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण, शहर संघटक दत्ता माने, विद्यार्थी जिल्हा सचिव सागर पडगळ, युवक शहर कार्याध्यक्ष विशाल सावंत, बापूराव कोले आदी उपस्थित होते.
बंडातात्यांच्या तोंडाला काळे फासणार
बंडातात्या कराडकर यांना पांडुरंगाची नगरी असलेल्या पंढरपूरमध्ये पाऊल ठेवू देणार नाही. पांडुरंगाच्या मंदिराची पायरी चढू देणार नाही आणि तसा प्रयत्न जरी केला तर ही राष्ट्रवादी युवती काँग्रेस तुमच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नसल्याचे जिल्हाध्यक्ष श्रीया भोसले यांनी सांगितले.
Post Views: 304
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay