2005 पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी
आम. सतेज पाटील यांची मुख्यमंत्री यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
19 Sep 2026, 8:18 AM
कोल्हापूर : दि . 1 नोव्हेंबर 2000 पूर्वी नियुक्त विनाअनुदानित व अंशतः अनुदानित तसेच अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च शाळांतील शिक्षक कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे .
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघ व खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांना या निवेदनाची प्रत दिली आहे.
या निवेदनात आ. सतेज पाटील यांनी म्हटले आहे की राज्यातील विनाअनुदानित, टप्पा अनुदानित व अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीचा दिनांक व सेवा काल विचारात घेऊन त्यांना जुनी पेन्शन देणे हे न्यायपुरक ठरणार आहे. जुनी पेन्शन योजना लागू केल्यामुळे सदर शिक्षक कर्मचाऱ्यांना सामाजिक व आर्थिक प्राप्त होणार असून त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षितता व स्थैर्य
लाभणार आहे. त्यामुळे शासनाने इतर सर्व आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना जशी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे, तशीच जुनी पेन्शन योजना या शिक्षक व कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत सहानुभूतीने निर्णय घ्यावा व या शिक्षक कर्मचार्यांना न्याय द्यावा अशा प्रकारची विनंतीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
Post Views: 68