तेल्हारा नगर परिषद येथे एकल महिला सर्वेक्षणाची प्रभावी अंमलबजावणी


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  11 Sep 2026, 9:41 AM
   

तेल्हारा : नगर परिषद च्या वतीने महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक 22 मे 2026 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून पहिला टप्पा म्हणून तेल्हारा शहरातील एकल महिलांच्या सामाजिक ,आर्थिक ,कायदेविषयी,शैक्षणिक ,आरोग्यविषयक व पुनर्वसन इत्यादी बाबत आवश्यक माहिती संकलित करण्याकामी विशेष नोंदणी करण्याचे काम नगर परिषद तेल्हारा व्दारे दिनांक 19 ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत करण्यात आले होते .
* एकल महिला मध्ये पुढील महिलांचा समावेश होतो :- विधवा / परित्यक्त्या /घटस्फोटीत /अविवाहित शहरातील एकल महिलांनी मोठ्या प्रमाणात विशेष नोंदणी कार्यक्रमात   उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविण्यात आला होता. *पुढील प्रकारात नोंदणी करण्यात आले . 1)विधवा :- 607  2)परित्यक्ता :-81  3)घटस्फोटीत :-33  4)अविवाहित :-23  असे एकूण 644 * * सदर  उपक्रम नगर परिषद च्या दिनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कक्ष व्दारे श्री  शंतनू वक्ते सहा प्रकल्प अधिकारी ,श्री चेतन्य देशमुख सहा कर निरीक्षक , श्री  सुरेश नागोलकर ,श्री संदीप बायड ,यांनी परिश्रम घेतले .सदर माहिती शासनास सादर करण्यात येत असून पुढील आदेश प्राप्त झाल्या नंतर एकल महिलांना लाभ दिला जाईल या बाबत मुख्याधिकारी श्री सतीश गावंडे यांनी कळविले आहे .
* *सदर उपक्रम  यशस्वी करण्यासाठी सौ वैशाली पालीवाल  नगराध्यक्ष ,  श्री सचिन तायडे उपनगराध्यक्ष ,नगर सेवक ,नगर सेविका तसेच श्री सतीश गावंडे  मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांच्या  मार्गदर्शनात करण्यात आले आहे .

    Post Views:  4


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व