संगीतकलेला मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे - प्रवचनकार डॉ.रवींद्र भोळे


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  08 Sep 2026, 8:16 AM
   

उरुळी कांचन तुपे वस्ती : संगीत कलेला अति प्राचीन असा इतिहास आहे. सत्ययुग, द्वापार युग, त्रेता युग पासून तर कलियुगापर्यंत तत्ववेत्यांनी संगीताचे महत्त्व सांगितले आहे. सामवेदामध्ये संगीताचा खूप अभ्यास सामावलेला आहे.संगीतामुळे ताण तणाव कमी होतो, स्मरणशक्ती व सकारात्मक प्रवृत्ती वाढीस लागते. गायनामुळे श्वासो श्वास सुरळीत होऊन मानसिक व शारीरिक व्याधी दूर होऊ शकतात. मानसिक व सार्वजनिक संबंध टिकवून ठेवण्यासाठी संगीत अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. संगीत कलेला जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. सम्राट बहुउद्देशीय जनजागृती सेवाभावी संस्था संचालित श्री साने संगीत विद्यालय सौ रेखा शिवराज साने, शिवराज ज्ञानोबा साने गायक यांचे वतीने गुणगौरव पारितोषिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रवींद्र भोळे यांनी वरील मत व्यक्त केले. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की अन्न ,अक्षर, आरोग्य आणि आचरण मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे असताना संगीत सुद्धा एक महत्त्वाची भूक असते. अशा प्रकारची संगीताची भूक भागवण्यासाठी साने सरांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमाला व्यासपीठावर विनोद मारुती अष्टूळ  जेष्ठ कवी लेखक व साहित्यिक,  सागर बाळासाहेब कांचन सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रवींद्र भोळे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन उरुळी कांचन, महंत गोपाल व्यास कपाटे महानुभाव पंथ उरुळी कांचन, उरुळी कांचन येथील पत्रकार सौ सुवर्णाताई कांचन, अमोल भोसले पत्रकार दैनिक केसरी बापूसाहेब चौधरी पत्रकार महाराष्ट्राची भूमी, सहदेव खंडागळे पत्रकार दैनिक लोकमत, प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सौ शिल्पा सतीश लेले संचालक श्री बालवाडी ह्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रमांमध्ये भारतीय गंधर्व महाविद्यालय अंतर्गत साने संगीत क्लासेस च्या विद्यार्थ्यांना गुणगौरव पारितोषिके प्रदान करण्यात आले.सूत्रसंचालन माननीय श्री रोहिदास बिचकुले सर प्रसिद्ध निवेदक यांनी केले. कार्यक्रमाचे आभार अमोलजी भोसले यांनी केले.

    Post Views:  14


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व