मालकीच्या जागेतील बांधकामाचा वाद न्यायप्रविष्ट असतांना बांधकाम पाडण्याची अकोला मनपा ची कारवाई अनुचित
छाया हॉस्पिटलच्या डॉ.छाया देशमुख यांचा आरोप
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
2026-06-15
अकोला - मालकी हक्काच्या जागेतील बांधकामाला अतिक्रमण संबोधून प्रकरण न्यायप्रविष्ट असतांनाही छाया हॉस्पिटलचे बांधकाम पाडण्याची अकोला महानगरपालिकेने केलेली कारवाई संपूर्णपणे अनुचित आणि मनमानी पद्धतीने करण्यात आलेली आहे.असा आरोप डाबकी रोडवरील छाया हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.छाया देशमुख यांनी केला आहे.
याबाबत त्यांनी माहिती देताना स्पष्ट केलेले आहे की, छाया हॉस्पिटलचे सर्व बांधकाम आमच्या मालकीच्या जागेत झालेले आहे.तरीही महानगरपालिकेने रस्ता रूंदीकरणासाठी आमच्या मालकीची जागा हडपण्याचा प्रयत्न घालविलेला आहे.त्यामुळे मालकीच्या जागेतील बांधकामालाही जाणून बुजून "अतिक्रमण" असा शब्दप्रयोग करून डाव साधला गेला.हा वाद न्यायप्रविष्ट असतांना सुध्दा बांधकाम पाडण्यात आले.कंपाऊंड वॉलचा काहीच संबंध नसतांना न्यायव्यवस्थेलाही न जुमानता ते सुध्दा जमिनदोस्त करण्यात आले.विनंतीनुसार या प्रकरणाची दि.१० जून रोजी सुनावणी सुरू असतांनाच बांधकामाची तोडाफोड करण्यात येत होती.यावेळी न्यायालयाचा आदेश येईपर्यंत कारवाई करू नये म्हणून विनंती करण्यात आली होती.न्यायालयाचे दस्तावेज मनपा अधिकाऱ्यांना दाखविण्यात आले होते.सायंकाळी न्यायालयाचा "जैसे थे" ठेवण्याचा आदेश आलेला होता.परंतू केलेल्या विनंतीला प्रतिसाद न देता त्यापूर्वीच कारवाई पूर्ण करण्यात आली.
छाया हॉस्पिटलच्या बांधकामामुळे गेल्या ३० वर्षात रहदारीला अडथळा झालेला नाही.रस्ता रूंदीकरणासाठी आम्ही सहकार्य करण्यास तयार होतो.त्यासाठी एम.आर.टी.पी अॕक्ट १२७ नुसार पर्चेस नोटीस दिली असतांनाही आमची जागा विनामुल्य हडपण्याचा गैर कायदेशीर डाव साधण्यासाठी वरील पर्चेस नोटीसकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात आले.असे करता येत नाही असे न्यायालयाचे स्पष्ट निर्णय यापूर्वी पुढे आलेले आहेत. मुळात मालकीच्या जागेत बांधकाम असतांना त्याला अतिक्रमण कसं काय संबोधता येते?याबाबत महानगरपालिका अधिकाऱ्यांनी आम्हाला स्पष्टीकरण द्यावे.या स्वार्थ प्रेरीत मनमानी कारवाईतून महानगरपालिकेने आमच्या मुलभूत नागरी आणि मालकी हक्कांवर घाला घालून आमच्यावर बळजबरीचा अन्याय केलेला आहे.आम्ही न्यायालयीन लढा चालू ठेऊच.परंतू मालकीच्या जागेचा वाद न्यायालयात असतांना अशी अनुचित कारवाई कोणत्या नियमाने केली जाते, याबाबत मनपा प्रशासनाने आम्हाला लेखी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी डॉ.छाया देशमुख यांनी केली आहे.
Post Views: 9