अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने उत्पादनची किम्मत जाहीर करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या वतीने पंतप्रधान, भारत सरकार यांना निवेदन पाठविण्यात आले
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
13 Jun 2026, 8:11 AM
किशोर मुटे
वर्धा - दि.१२ जून २०२६ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने MRP कमी करण्यासाठी दुपारी 10 ते 11वाजे पर्यंत वर्धा येथे महात्मा गांधी यांच्या पुतल्या जवल MRP कमी करण्या साठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पदाधिकारी व कार्यकर्तानी मांगन्यांचे नारे लावुन शांततेत धरने आंदोलन केले.
व वनिवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर वर्धा यांना निवेदन देण्यात आले असून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत.
उत्पादन खर्चावर आधारित वस्तूंची किरकोळ MRP किंमत उदाहरण मेडीसीन शेती औषधी अवजारे इत्यादी एक देश एक MRP किरकोळ किंमत फसव्या जाहिरातीवर बंदी व इतर किंमतीच्या माध्यमातून ग्राहकांची होत असलेली लुट थांबविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर वर्धा यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
यावेळी निदेवन देताना उपस्थित असलेले किशोर मुटे, सतिश देशमुख, विनोद पोटे, विभा देशमुख, कल्याणी मुटे, उत्तम सावरकर, त्र्यंबक पुष्पलवार, जनकजी पालीवाल, भाऊराव कोटकर, प्रफुल्ल क्षिरसागर, नंदू नेरोटे, सुरेश भंडागे, प्रणिता कश्यप, इत्यादी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच आज दि.12 जुन 26 ला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने MRP च्या माध्यमातुन होत असलेल्या ग्राहकाची लुट थांवविण्या साठी आज नवी दिल्ली येथे जंतर-मंतर मैदान येथे सुध्दा आंदोलन करण्यात आले.त्यांनाच पाठीबा म्हणुन सर्व जिल्हा स्तरावर निवेदन देण्यात आले.
Post Views: 1