गोव्यातील लिहिणाऱ्या हातांचा उत्सव अ.भा.कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी देवकाबाई देशमुख


 विश्व प्रभात  25 Nov 2024, 6:17 PM
   

अकोला ः साहित्यलेणी प्रतिष्ठान ताळगाव, कला आणि संस्कृती संचालनालय पणजी, अखिल भारतीय मराठी साहित्य संस्था बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने लिहिणाऱ्या हातांचा उत्सव या उपक्रमातंर्गत अखिल भारतीय कवि संमलनाचे आयोजन पणजी येथे करण्यात आले आहे. हे संमेलन पणजी येथील कला आणि संस्कृती संचालनालयाच्या लेक्चर हॉलमध्ये १४ डिसेंबर रोजी होईल. 
       या संमेलनाचे उद्घाटन मेघना कुरुंदवाडकर गोवा, अनुराधा कुलकर्णी व अकोल्याच्या ज्येष्ठ गजलकार देवकामाई देशमुख यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. यावेळी उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व उद्योजक डॉ. गुरूदास नाटेकर व विशेष अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संस्थेच्या प्रा. पद्मा हुशिंग, प्रमुख पाहुणे म्हणून सहकार क्षेत्राचे किसन फडते, लोकसाहित्यिका प्रा. पौर्णिमा केरकर, ज्येष्ठ लेखिका, उद्योजिका रजनी रायकर उपस्थित राहतील. 
या संमेलनाच्या आयोजक चित्रा क्षीरसागर विभागीय कार्यवाह, बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली व ज्येष्ठ साहित्यिक आणि संयोजक साहित्य लेणी प्रतिष्ठानचे सचिव प्रकाश क्षीरसागर आहेत. प्रथम उद्घाटन सत्रानंतर कविसंमेलन होईल. या कार्यक्रमाची अध्यक्षता गोव्याच्या मीना समुद्र करतील व डॉ. अनघा सोनखासकर यांच्या उपस्थितीत होईल. या कार्यक्रमाचे संचालन श्रुती हजारे व प्रा. प्राजक्ता सामंत करणार आहेत.

    Post Views:  103


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व