भिमाकोरेगाव नगर येथील पुन्हा एकदा लहान बालकास घेतला मोकाट कुत्र्याने चावा ; आणखीन किती बळी घेणार?


लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ च्या वतीने मोकाट कुत्र्याने चावा घेतलेल्या बालकाची घेतली भेट!
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  28 Oct 2024, 8:41 AM
   

परभणी -  गेल्या काही महिन्यांपासून शहरातील धार रोड येथील भिमाकोरेगाव नगर येथे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट आणि त्याच मोकाट कुत्र्यांनी लहान बालक यांच्यावर हल्ला करून चावा घेण्याचे सत्र सुरूच आहे. गेल्या दोन - तीन वर्षात येथे मोकाट कुत्र्यांच्या हल्लात 2 बालकांचा मृत्यू झाला व 10-12 जणांना चावा घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्यातच आज दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी  एका 10 वर्षीय प्रेम किशोर डोंगरे या बालकास भिमाकोरेगाव नगर येथे घरी जाताना माघून एका मोकाट कुत्र्याने त्याच्या डाव्या हाताला चावा घेऊन जखमी केल्याची घटना घडली आहे. ही बातमी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अंभोरे यांना कळताच जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर व महाराष्ट्र संघटन प्रमुख भगीरथ बद्दर यांच्या सुचने नुसार कार्याध्यक्ष प्रमोद अंभोरे व सहकारी पत्रकार संदीप वायवळ यांनी तात्काळ परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठून सदरील बाल रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक किशोर डोंगरे यांची भेट घेऊन व तसेच बाल रुग्ण याच्या बद्दल डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करून माहिती घेतली. मिळालेल्या माहिती नुसार सद्या बाल रुग्णाची प्रकृती चांगली आहे. यावेळी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ चे परभणी जिल्हा कार्याध्यक्ष यांनी मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाटी बद्दल महानगर पालिका जाणून बुजून डोळे झाक करते का? शासन प्रशासन आणखीन किती लोकांचा बळी घेणार आहेत? वारंवार घडत असलेल्या या प्रकारबद्दल गांभीर्याने का घेतले जात नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ता संदर्भात जनहितार्थ लवकरच लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ च्या वतीने मा. जिल्हाधिकारी परभणी, मा. आयुक्त महानगर पालिका परभणी यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ चे परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अंभोरे यांनी दिली आहे.

    Post Views:  124


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व