लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघासारख्या संघटना प्रोत्साहनातून सामाजिक चेतना जागवित असतात : विठ्ठल कांगणे


लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या उद्घाटनानंतर भगिरथजी बद्दर यांचा सत्संग समारोप
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  13 Sep 2023, 9:46 AM
   

परभणी - सामाजिक परिवर्तनासाठी उपक्रम,जनजागृती आणि प्रबोधनात्मक प्रभावी कार्यसिद्धीसाठी प्रोत्साहन देत राहणाऱ्या विधायक संघटनांचे योगदान हे महत्वपूर्ण असते.त्यासाठी मागून धक्का देणाऱ्या सद्विचारांचं पाठबळ लागतं.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ अशा समाजसेविंना आणखी चांगले काम करून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणारी एक राष्ट्रीय समाजाभिमुख संघटना आहे.या संघटनेने सन्मानपर देऊन माझा गौरव केल्याने या नैतिक पाठिंब्याने मी भविष्यात आणखी चांगले कार्य करू शकेल.असा मनोदय शैक्षणिक आणि सामाजिक जागृतीच्या क्षेत्रातील सुपरिचित अग्रेसर मार्गदर्शक,समुपदेशक श्री विठ्ठल कांगणे यांनी परभणी येथे केले.त्यांनी व  श्री संजय देशमुख तथा किरण मानवतकर यांनी भगीरथ बद्दर यांच्यातील सर्वसमावेशकतेच्या व आदर सन्मानाच्या भावनांची प्रशंसा आणि उपक्रमांमधील सक्रियतेचे कौतुक केले.
           मराठवाड्यात लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या परभणी जिल्हा कार्यालयाच्या उद्घाटनानंतर लोकस्वातंत्र्यचे महाराष्ट्र संघटन तथा संपर्क प्रमुख भगिरथजी बद्दर यांचेकडील सत्संग उपक्रमातील समारोपीय कार्यक्रमात ते विशेष अतिथी सत्कारमुर्ती म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी विश्वकर्मा महासंघ या  बारा बलूतेदारांच्या संघटनेचे अध्यक्ष सुभाष पांचाळ तर विशेष प्रमुख अतिथी म्हणून  लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख होते.तर प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे केन्द्रीय उपाध्यक्ष प्रदीप  खाडे,मार्गदर्शक पदाधिकारी व शासनाच्या साहित्य  व संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे,विदर्भात विभागीय संघटन तथा संपर्क प्रमुख पंजाबराव देशमुख,रामराव देशमुख,कर्नाटक राज्य संघटन संपर्क प्रमुख सौ.सरोजीनी आर्गे दक्षता समितीच्या अनिता ताई सरोदे,सेवानिवृत्त पशुसंवर्धन अधिकारी किरण मानवतकर उपस्थित होते.
      सर्वप्रथम भव्य पुष्पहाराने अतिथींचे स्वागत करण्यात आले.यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या केन्द्रीय कार्यकारिणीकडून किरण मानवतकर यांचा व भगिरथ बद्दर यांना सपत्नीक शाल,पुष्पहार व‌ सन्मानपत्र देऊन  त्यांचे वाचन करीत सन्मानित करण्यात आले.पत्रकार देवानंद वाकळे ,ज्येष्ठ पत्रकार मदन कोल्हे,विवेक मुंदडा,गिरी,विजयकुमार खिस्ते, पांचाळ,देशमुख,पाटील,चाटे, डॉ.गीता मुंडे, यांचे पण सत्कार करण्यात आले.
            श्री बद्दर यांचेकडील पूजा पाठ,भजन नामसंकीर्तनाच्या आयोजित कार्यक्रमाचि समारोप यावेळी झाला.सर्वांगसुंदर नियोजनाने पार पडलेल्या या कार्यक्रमाचे संचलन मुकूंद नंद यांनी केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमाला लोकस्वातंत्र्यचे  परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर,बीड जिल्हाध्यक्ष रामराजे देशमुख,सर्व विभागीय पदाधिकारी,सभासद व स्नेही मंडळी उपस्थित होती.

    Post Views:  171


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व