माढा येथे श्री संत वासुदेव महाराज पालखीचे भक्ती भावाने स्वागत


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  23 Jun 2023, 11:26 AM
   

अकोला : (माढा येथून थेट पालखी मधून) श्री क्षेत्र श्रद्धा सागर अकोट येथून निघालेली श्री संत वासुदेव महाराज पालखीचे आज सकाळी रिधोरे गावामध्ये सकाळी अकरा वाजता आगमन झाले त्या ठिकाणी गावात पालखीचे धार्मिक विधीप्रमाणे भक्ती भावाने स्वागत करण्यात येऊन या गावचे प्रतिष्ठित नागरिक अमर गायकवाड यांच्या  परिवाराच्या वतीने पालखीचे भक्ती भावाने स्वागत करण्यात येऊन त्या गावांमध्ये सर्व पालखीतील वारकऱ्यांना महाप्रसाद देण्यात आला .प्रवचन झाल्यानंतर पालखी माढा कडे प्रस्थान केले अनेक ठिकाणी पालखीचे स्वागत चहापान फराळची स्थानिक नागरिकांनी जागोजागी  पालखीचे स्वागत केले संध्याकाळी पालखी सात वाजता माढा नगरीमध्ये पोचली त्या ठिकाणी सुद्धा नगरवासीयांनी पालखीचे चौका चौकात स्वागत तसेच दर्शन घेतले त्यानंतर पालखी माढा येथील प्रतिष्ठित दानशूर व्यक्ती बाळासाहेब सुरवसे यांच्या घरी पोचली त्या ठिकाणी भक्ती भावाने पालखीचे स्वागत करण्यात आले. आरती करण्यात आली. पालखीतील वारकऱ्यांना महाप्रसादा देण्यात आला. 

त्यानंतर रात्री नऊ वाजता कीर्तनाच्या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली. पालखीचा आनंद उत्सव वारकऱ्यांनी व गावकऱ्यांनी मोठा आनंद साजरा करू जागोजागी विठू रायाचा नामाचा गजर, तुकाराम महाराज ,ज्ञानेश्वर माऊली, संत वासुदेव महाराज यांच्या नामस्मरणने नगरी दुमदुमून गेली होती. तसेच रस्त्याने सुद्धा वेगवेगळ्या अभंगाणी, भावगीतने, तसेच फुगड्या  पालखीतील वारकरी भक्ती सागर मध्ये लिन झाले होते. त्यानंतर पालखी रात्रीचे मुक्काम आटपून  दुसऱ्या दिवशी सकाळी पंढरपूर कडे प्रस्थान झाली. आज या पालखीला अकोट वरून निघून 23 दिवस पूर्ण झाले आहे तरी भक्तगणामध्ये तो जोश तोच उत्साह आनंदामध्ये या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहे .पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन हे सगळे वारकरी पंढरीनाथाच्या नगरीकडे जाण्याकरता आतुर झालेली आहे अशा या पालखी सोहळ्याचे नेतृत्व श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष श्री ह भ प वासुदेव महाराज महल्ले पाटील हे करीत असून ते स्वतः या वारीमध्ये पैदल  प्रवास करीत आहे. तसेच या पालखीचे उत्कृष्ट व्यवस्थापन श्री ह भ प अंबादास महाराज मानकर हे करीत आहेत. तसेच ह भ प महादेवराव ठाकरे व ह भ प गजानन दुधाट यांच्या मार्गदर्शनात विश्वस्त  अनिल कोरपे, श्रीराम कोरडे, नागोराव बायसकार, ज्ञानेश्वर नराजे , अनिल नराजे, पंकज कुलट, उमेश मोहकार, संतोष मंगळे, अविनाश सावरकर, बापजी शिंदे, रवी मते, बाळकृष्ण वाकोडे, गोपाळराव मंगळे, व सर्व वारकरी भक्त व सर्व महाराज मंडळी श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था तीर्थक्षेत्र श्रद्धा सागर अकोट जिल्हा अकोला हे परिश्रम घेत असून हा पालखी सोहळा यशस्वी करण्याकरता मेहनत घेत आहे अशी माहिती या वारीमध्ये सहभागी असलेले वारकरी समाजसेवक गजानन हरणे यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे थेट दिंडी मधून दिली आहे. 

    Post Views:  540


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व