महिलानी आपल्या जीवनात संस्कार उतरावे : डा पल्लवी अघडते
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
14 Apr 2023, 8:06 PM
अकोला : आईने स्वतः ऋषिप्रणित संस्कारांना आपल्या जीवनात धारण करावे मानव जीवन दुर्लभ आहे त्यात महिलेचा जन्म मिळणे भाग्याची बाब आहे आई भगवंताच्या सहकार्याने नवीन सृष्टीचे निर्माण करते भावी पीढीला घडविते तिला योग्य मार्गदर्शन , प्रेरणा देना जरुरीचे आहे गायत्री परिवार देशाची भावी पीढी संस्कारवान बनविण्यासाठी भारतच नाही संपूर्ण विश्वात कार्य करीत आहे व प्रेरणा देत आहे माझी सिनियर एमडी डॉक्टर जी सद्या मिशिगन अमेरिकेत आहे तिची बहिन जर्मनी म्युनिच येथे आहे तिचा ऑनलाइन गर्भसंस्कार डा अजय उपाध्याय यांनी शांतिकुंज हरिद्वार च्या सहकार्ययाने करून दिला ते परदेशात जरूर आहे पण संस्कार, संस्कृती ला जपतात या घडवू या संस्कारवान पीढी अभियानाची ऑनलाइन निशुल्क गर्भवती ची पाठशाळा मी स्वतः रोज झूम ऐप द्वारे जॉईन होते मी स्वतः एमडी डॉक्टर आहे व या गर्भसंस्कार ची महत्ता ला वैज्ञानिक दृष्टिकोनातून जाणते व समझते स्वतः चे संस्कार वेळोवेळी करून घेते गर्भवती बहिणींनी गायत्री परिवारा च्या निशुल्क सेवेचा लाभ घ्यावे असे मार्गदर्शन, प्रतिपादन डा पल्लवी अघडते यांनी गायत्री संस्कार केन्द्र कृष्णनगरी कौलखेड अकोला येथे आयोजित रविवारीय यज्ञ संस्कार प्रसंगी सांगितले हया अभियानाला सफल बनविण्यासाठी किसनराव मोरे काका, यामीनी दीदी, रजनी उपाध्याय, नीता दिवनाले, वंदना फाटे , योगिता सातपुते, प्रज्ञा मालवीय,पल्लवी चवरे, मंजुषा भांबुरकर, विक्की अघडते,अभय महाराज उपाध्ये, डा रामजी उपाध्याय, शितल सावके, गायत्री सावके व गायत्री परिवार महिला यांनी परिश्रम घेतले
Post Views: 216