एल. आर. टी. कॉलेजच्या एन. सी. सी. कॅडेट ऋषिकेश पटेलची निवड


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  14 Aug 2022, 10:05 PM
   

अकोला-- नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर दि.१५ ऑगस्ट रोजी "आजादी का अमृत महोत्सव" निमित्ताने राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने होणाऱ्या "एक भारत श्रेष्ठ भारत" इंडिपेंडन्स डे कॅम्प 2022 साठी अकोला येथील श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालयाचा राष्ट्रीय छात्र सेनेचा कॅडेट ऋषिकेश पटेल या विद्यार्थ्याची निवड झाली. देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि रक्षा मंत्रालय यांनी केलेल्या आव्हानानुसार देशभरातील विविध राज्यातून राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स दि. ०१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरासाठी उपस्थित राहतील. हे शिबिर दिल्ली येथील राष्ट्रीय छात्र सेनेचे डी.जी. निदेशालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे. त्यांनतर हे शिबिरार्थी दि. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात विविध देशातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सना भारतातील विविध सांस्कृतिक परंपरा आणि पद्धतीची ओळख सांस्कृतिक उत्सवाच्या माध्यमातून करून देतील. तसेच त्यांच्या विचारांची देवाण घेवाणही करतील. ११ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बिजॉय चौधरी व लेफ्टनंट कर्नल चंद्रप्रकाश भदोला यांच्या मार्गदर्शनाने तसेच श्रीमती. एल. आर. टी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. जी. चापके व महाविद्यालयाचे एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या प्रेरणेने दिल्ली येथील कॅम्प पर्यंत पोहोचलो याची तो श्रेय देतो. कॅडेट ऋषिकेश पटेल याच्या निवडीबद्दल दि. बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. विजयकुमार तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष श्री. रवींद्र जैन, मानद सचिव श्री. पवन माहेश्वरी, सहाय्यक सचिव इंजि. अभिजित परांजपे व समस्त माननीय कार्यकारी सदस्यांनी त्याचे अभिनंदन केले.

    Post Views:  172


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व