आधार फाउंडेशनच्या वतीने गुणवंतांचा सत्कार संपन्न
अकोला : प्रभाग क्र. 4 येथील सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आधार फाऊंडेशनच्या वतीने प्रभागातील दहावीच्या परीक्षेत अकोला एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमधून प्रथम येणा-या विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
यात न्यू तापडिया नगर येथील चि. पीयूष जयकीसन दंदे याला 99.84% व कु. मुक्ता मिलिंद बोरगांवकर 99% या दोन्ही विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त करून त्यांच्या कुटुंबासोबतचं परिसराचा देखील सन्मान वाढविल्या बद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह आधार फाऊंडेशन चे अध्यक्ष माणीक शेळके व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ व गुणगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला
प्रभागात विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आधार फाऊंडेशन चे युवक आघाडीवर असतात.यावेळी फाऊंडेशन चे अध्यक्ष माणीक शेळके, सचिव राहूल ठाकूर, ऍड. अनिल जगताप, राजूभाऊ लाहोरे, किशोर ठाकरे,गौरव पांडे, केवल ठाकूर, प्रेम लहरिया, सुमित ठाकरे, तेजस पवार, मंगल इंगळे, सुशील ठाकरे उपस्थित होते. दोन्ही विद्यार्थ्यांचे शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक करणा-या आधार फाऊंडेशनचे त्यांच्या आई-वडिलांनी आभार मानले.
Post Views: 247