किशन गोरडिया विश्ववृत्ती फाउंडेशन तर्फे कुर्ला येथे स्कुल चलो अभियान द्वारा रॅलीचे आयोजन


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  07 Jun 2022, 11:51 AM
   

नागपूर (किशोर मुटे) : किशन गोरडिया विश्ववृत्ती फाउंडेशन तर्फे कुर्ला येथील ठक्करबाप्पा परिसरात स्कुल चलो अभियानची रॅली काढण्यात आली. परिसरातील चिमुकल्यांनी चलो चलो स्कुल चलो, एक दोन तीन चार - साक्षरताची जयजयकार अशा स्फूर्तिदायक फलक घेऊन घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. 

    कुर्ला येथील ठक्करबाप्पा परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग वसलेला आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होतो. कोरोना महामारीनंतर यावर्षी पासून पूर्णपणे प्रत्यक्ष शाळा सुरु होत आहे. परंतु दोन वर्षानंतर आपल्या पाल्यांना शाळेत प्रवेश साठी अनेक पालकांना अडचणी येत आहे. म्हणूनच किशन गोरडिया विश्ववृत्ती फाउंडेशन तर्फे शाळा प्रवेशाबाबत जनजागृती करण्यासाठी स्थानिक विद्यार्थी व कार्यकर्ते सोबत रॅली चे आयोजन केले होते. यावेळी स्थ्यनिक पालकांकडून अनेक प्रश्न समोर समोर आले. म्हणून केजीव्हीएफ यापुढे संपूर्ण वस्तीमध्ये स्कुल चलो अभियान राबवून विद्यार्थ्यांचे शाळेत प्रवेश बाबत प्रश्न सुटतील यावर कार्यरत असेल. 

    Post Views:  211


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व