मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणचा सफाया


वाहतुकीस अडचण ; नागरिकांनी केल्या होत्या तक्रारी
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  22 Apr 2022, 8:37 PM
   

अकोला -  महापालिका अतिक्रमण निर्मुलन पथकाने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर कारवाईचा सपाटा लावला असुन शुक्रवारी दक्षिण झोनमधील जुने आरटीओ रोडवरील तसेच मलकापुर ग्राम पंचायत चौक ते समीक्षा कॉन्व्हेंट, खडकी पर्यंतच्या रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात आले.  नागरिकांकडून या परीसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. परिणामी नागरिकांना ये-जा करण्यास अडचण निर्माण झाली होती. परिसरातील नागरिकांनी दक्षिण झोन कार्यालयात अतिक्रमण काढण्यासंदर्भात अनेक तक्रारी केल्या होत्या.  त्या अनुषंगाने मनपा आयुक्त यांच्या आदेशावरुन सदर अतिक्रमणांवर मनपा अतिक्रमण विभाग आणि दक्षिण झोन कार्यालयाव्दारे निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई सहा.आयुक्त अतिक्रमण जगदीश देशमुख यांच्या मार्गदर्शनात झाली असून कारवाईत क्षेत्रीय अधिकारी देविदास निकाळजे, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, दक्षिण झोन कार्यालय येथील सहा.कर अधिक्षक प्रशांत बोळे, कनिष्ठ अभियंता प्रतिक कटियारमल, अतिक्रमण विभागाचे उमेश धुर्वे, जीवन मानकीकर, संतोष भगत, सैय्यद रफीक, योगेश कंचनपुरे, रूपेश इंगळे, पवार आणि गायकवाड आदी सहभागी होते.

    Post Views:  149


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

शोकसंदेश

४२ मिनेट