साहित्यकांनो काल्पनिक नको वास्तव लिहा - पुष्पराज गावंडे


विसावे रजधूळ मराठी साहित्य संमेलन तथा गोकुळाष्टमी सोहळा थाटात संपन्न..
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  08 Sep 2026, 8:11 AM
   

अकोला : योगिनी समाजसेवा संस्था अकोला द्वारा आयोजित   विसावे रजधूळ  मराठी साहित्य संमेलन  व  गोकुळाष्टमी जन्माष्टम सोहळ्याचे नुकतेच आयोजन  करण्यात आले होते. त्यावेळी  ज्येष्ठ  साहित्यिक पुष्पराज गावडे अध्यक्षपदावरून  बोलताना म्हणाले की अकोला जिल्हा ही     साहित्याची खाण असलेली नगरी असून या जिल्ह्याला साहित्य चळवळीची मोठी परंपरा लाभलेली आहे. बाजीराव पाटील विठ्ठल वाघ  नारायण कुलकर्णी कवठेकर यासारख्या अनेक मातंबर साहित्यिकांनी या जिल्ह्याला महाराष्ट्रात ओळख निर्माण करून दिली. जिल्ह्यातील अनेक साहित्यिकांचे साहित्य पाठ्यपुस्तका त अभ्यासक्रमाला लागले असून जिल्ह्यात साहित्य चळवळ मोठ्या प्रमाणात राबवल्यात  जात आहे..   रजधूळ मासिक योगिनी समाजसेवा संस्था अकोला  अश्या अनेक  संघटनांनी अकोला जिल्हातील साहित्यिकांना हक्काच व्यासपीठ अकोला जिल्ह्यात सातत्याने मिळवून दिले आहे या साहित्यिक संघटनाचे वर्षभर साहित्य कार्यक्रम सुरू असतात. ही  नवोदित साहित्यिकांसाठी  अभिमानाची बाब असून   साहित्यिकांनी नवीन काहीतरी लिहिले पाहिजे म्हणून माझे साहित्यिकांना आव्हान आहे कि साहित्यिकांनो काल्पनिक नव्हे तर वास्तव मांडले पाहिजे  . माईनी रजधूळ  मासिका च्या  माध्यमातून अनेक  नवो दितांना लिहिते करून अनेक साहित्यिक घडवले आहेत  असे प्रतिपादन  साहित्य संमेलनाचे संमेलना ध्यक्ष पुष्पराज गावडे यांनी केले..संमेलना चे उद्घाटन   सीमा झावरे यांनी  केले तर प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर योगिनी समाज सेवा संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती देवका देशमुख  डॉ. विजय दुतोंडे   प्रा विजय अग्रवाल पद्माकर आखरे  कविता कठा णे  नीता बोबडे पुषा दलाल  आदीची प्रमुख उपस्थिती होती  कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली लगळ यांनी तर सूत्रसंचालन शुभांगी पोकळे यांनी केले.  त्यानंतर लगेच कवी संमेलनला सुरुवात करण्यात आली. निशा बोबडे  प्रांजल रायपुरे  सरिता विसपुते प्रतिभा पाथरीकर सुनिता भुजबळ अमिता घाटोळ संगीता ताथोड  यशवंत पाटील गोपाल मापारी अविनाश येलकर डॉ.गणेश मेनकर प्रशांत वरई कर विशाल नं दागवळी तुषार कोरडे निलेश तुरके विद्या बनाफ र ज्योती कुलकर्णी 
सुमेध वानखडे शिवलींग काटेकर वासुदेव खोपडे, कर गजानन छबिले राजाभाऊ देशमुख,  तुळशीराम  बोबडे   धीरज चावरे  रोहिणी गंधे वार  ज्योती कुलकर्णी     लता थोरात  सुनील लव्हाळे  सविता भुजबळ आदिनी आप आपल्या बहारदार कविता सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. संमेलन यशस्वी साठी राजेंद्र देशमुख नाना  दुतोडे किशोरराव देशमुख  निकिता बेले   वैशाली लगळं मुणवी रानडे  पूजा मोरे अश्विनी हळदे दिपाली गावंडे विद्या आखाडे  कल्पना अभ्यंकर हर्षा ठाकरे कल्याणी चव्हाण  निकिता वेले संतोषी केदारे सुनिल देशमुख दीपाली गावंडे  शुभांगी पोळके पूजा   मोरे तीष्णमाला तायडे कुशल महल्ले    दिलीप थोरात संदीप कुकडे सागर राऊत आदिनी अथक परिश्रम घेतले...

    Post Views:  50


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व