मी प्रथम देशाचा हे कायम लक्षात ठेवून देशसेवा करा - डॉ. जयपाल पाटील


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  23 May 2026, 11:21 AM
   

उंबरखिंड, खोपोली : छत्रपती शिवाजी  महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या ऐतिहासिक स्थळावर सन १६६१ ला फक्त 1000 मावळे घेऊन मुघल सरदार  कारतलब खान च्या हजारो सैन्यांवर विजय मिळवलेला हीच  उंबरखिंड असून पुढे देश सेवा करताना विजयाचं लक्ष कायम ठेवून जीवनात आपत्ती कधी केव्हा येईल हे सांगता येत नसल्याने नेहमीच्या जीवनात आपण व आपले नातेवाईक सुरक्षित कसे राहतील यासाठी या ऐतिहासिक स्थळी आयोजक कमांडर सौ.गौरी शेट्टी यांनी  जोश निवासी शिबिरात बोलावले असून     माझे रायगडचा युवक  फाउंडेशनचे तज्ञ  आपणास जे जे सांगतील त्याचा वापर आपण जरूर करावा व इतरांनाही सांगावा  असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन तज्ञ यांनी सी गाईड आणि स्काऊट कॉलेज मावळ पुणे यांचे वार्षिक ट्रेनिंग कॅम्प १० मे  ते 19 मे२०२६ पर्यंत असलेल्या निवासी शिबिरात प्रमुख पाहुणे रायगड भूषण प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील मार्गदर्शनात सांगितले.यावेळी व्यासपीठावर रायगडचा युवक फाउंडेशनचे सल्लागार एडवोकेट गोपाळ शेळके, आपत्ती सुरक्षा मित्र प्राध्या. संतोष पाटील, सी गाईड आणि स्काऊट कॉलेजचे कॅप्टन  गोपी शेट्टी, कमांडर जी. सी. बेहरा, लेफ्टनंट शेंडकर, लेफ्टनंट दुधात, मिडलशिप मॅन बुधावले, सब लेफ्टनंट कांबळे हे मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांचे खास गळ्यातील पट्ट्या ने कमांडर बेहरा यांनी स्वागत केले.प्रारंभी प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील यांनी सर्वांसोबत संविधानाचे वाचन केले आणि आपल्या घरातील आजी आजोबा जिन्यावरून पडले डोक्याला पायाला दुखापत झाल्यास आणि रस्त्यावर अपघात झाल्यास १०८ रुग्णवाहिकाला कसे पाचारण करावे याचे प्रात्यक्षिक देताना रायगड जिल्ह्याचे 108 चे प्रमुख श्री. यांच्याशी संपर्क साधताच पाली येथून डॉक्टर रईसमोमीन आणि पायलट श्री. ज्ञानेश्वर जगताप पोहोचून डॉक्टर यांनी१०८ ची माहिती दिली. मोटरसायकल आणि कार कोण चालवतो असे विचारतात साधारण 60 मुला मुलींनी चॉकलेट घेऊन हसत खेळत सांगितले. अपघात झाला आहे असे रायगड वाहतूक पोलीस दलाला मदतीसाठी फोन केला असता पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र आरोळे व त्यांचे सहकारी हवालदार श्री. राजेंद्र राठोड, श्री. दीपक तातोटे  उपस्थित राहून मुला मुलींना वाहतूक नियमांची महत्त्वाची माहिती पोलीस निरीक्षक श्री आरोळे यांनी दिली. उपस्थित मुली मुलांच्या बहिणी आई यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस कसे कार्यरत असतात यासाठी  ११२ क्रमांकाचा वापर कसा करावा या क्रमांकावर फोन करतात खालापूर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस शिपाई मनिषा केंद्रे, आणी उदया शिंदे ३० मिनिटात हजर होऊन 112 क्रमांक चा वापर कसा करावा त्यांच्यासोबत असलेल्या अद्यावत संपर्क च्या मशीनची माहिती दिली.
यावेळी एडवोकेट गोपाळ शेळके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्ध कलेची माहिती देऊन आपण यापुढे देशसेवा करणार आहात तेव्हा देशासोबत कधीही गद्दारी करू नका असा मोलाचा सल्लाही दिला, यावेळी छोटा मावळा कुमार गंधर्व बडेकर यांने छत्रपती शिवाजी महाराजांच्या उंबरखिंडीचा गौरवशाली इतिहास सांगितला. प्राध्या. संतोष पाटील यांनी आपण सारे जण मोबाईलचा वापर करतो मोबाईल वरील गुगल भाऊ आपल्याला सर्व काही ज्ञान देतो याच मोबाईलवर आपला सेल्फी पाठवा 50 रुपये मिळतील, आपल्या जवळच्या एसटी स्टँड बाजारपेठ त्यांचे फोटो पाठवा 100 रुपये मिळतील, आपण निसर्गाच्या सानिध्यात धरणा जवळ गेलात तेथील रील पाठवा 500 रुपये मिळतील असे गेम खेळले जातात आणि अचानक पणे आपण देशविरोधी कारवाई मध्ये सामील होतो म्हणून मुला मुलींनो असले खेळ खेळू नका. मोबाईलचा वापर शिक्षणासाठी करा  असे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस पाटील श्री विवेक बडेकर, श्री अंबवणे, श्री. रंगाची दाखणे श्री.साळुंके समाजसेवक व ग्रामस्थ२०० विद्यार्थी उपस्थित होते.  शेवटी डॉ. जयपाल पाटील यांनी देशाचे आपत्ती प्रमुख पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी, सचिव श्री अमित शहा, महाराष्ट्र राज्य आपत्ती प्राधिकरण प्रमुख मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस  जिल्हाधिकारी रायगड श्री. किसन जावळे  श्री. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल,    रायगड जिल्हा वाहतूक पोलीस दलाच्या प्रमुख पोलीस निरीक्षक श्रीमती सरिता चव्हाण  श्रीमती, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.सचिन पवार,बीव्हीजी १०८ चे प्रमुख श्री. हनुमंतराव गायकवाड यांचे आभार मानले. शेवटी श्रीमती गौरी शेट्टी यांनी उपस्थिताचे आभार मानले.

    Post Views:  6


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व