अकोला,दि.1- राज्य निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम निर्धारीत केला आहे. कार्यक्रमानुसार निवडणूक आयोगाने निर्धारीत दावे व हरकती रविवार दि. 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिली.
दावे व हरकती स्विकारण्याचा सुधारीत कालावधी याप्रमाणे : दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी सोमवार दि. 1 नोव्हेंबर ते रविवार दि. 5 डिसेंबर 2021 पर्यंत. दावे व हरकती सोमवार दि. 20 डिसेंबर पर्यंत निकालात काढणे. तर अंतीम मतदार यादी बुधवार दि. 5 जानेवारी 2022 प्रसिद्धी होईल.
जिल्ह्यातील नागरिकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे इत्यादी करीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे आवश्यक फॉर्म भरून देण्यात यावे. मतदार यादीतील दुबार, स्थलांतरीत, मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाही सुध्दा प्रस्तृत मोहिमेत घेण्यात येणार आहे. तरी अकोला जिल्ह्यातील सर्व नाव व पात्र मतदार यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने www.nvsp.in या संकेतस्थळावर जाऊन आपले नाव नोंदवावे किंवा व्होटर हेल्पलाईन ॲपच्या मदतीने सुध्दा मतदारांना आपले नाव नोंदविता येईल. या व्यतिरिक्त ज्या मतदारांना ऑफलाईन पध्दतीने आपले नाव नोंदवावयाचे असेल त्यांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज भरून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे देण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.