मॉ जिजाऊ नगर येथे वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम संपन्न


वृक्षवल्ली आम्हा सोयरे प्रमाणे संवर्धनाची गरज : विजयकुमार गडलिंगे
 विश्व प्रभात  23 Aug 2026, 9:38 AM
   



अकोला : जगतगुरु तकोबाराय म्हणत होते की, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, या प्रमाणे वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व मानवाधिकार संघाचे विजयकुमार गडलिंगे यांनी मॉ जिजाऊ बहुउद्देशीय महिला मंडळ, अकोला महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट यांच्या वतीने ़खडकी विभागात जिजाऊ नगरात वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रमात बोलत होते़ प्रमुख अतिथी विजय पारतवार साहेब उपायुक्त अकोला मनपा, विजयकुमार गडलिंगे अध्यक्ष : शेजारी फाउंडेशन, सर्वश्री नगरसेवक शंकरराव लंगोटे, विजयकुमार इंगळे, विनोद मापारी, सुरेखाताई मंगेश काळे, सोनाली गणेश अंधारे, साहित्यिक तथा पत्रकार पंजाबराव वर, मेहुल पांडे प्रोजेक्ट मॅनेजर, स्वप्निल पळसकर कॉर्डीर्नेटर, संदीप साबळे, अनुज भुईवार, कु. प्रियल ताले, रंजीत लोहकरे, सुपद वानखेडे, संतोष गुजर, अनिकेत लोहकरे, तसेच या कार्यक्रमाकरिता शहरातील विविध बचत गटातील महिला सुद्धा उपस्थित होत्या़ त्यामध्ये श्रावस्ती बचत गट, इंद्रायणी बचत गट शिवसेना वसाहत, विदर्भ बचत गट, अजिंठा बचत गट भिमनगर, भूमी बचत गट भिमनगर, समता बचत गट भिम नगर, रमाई बचत गट जतवन नगर, अन्नपूर्णा बचत गट भिम नगर, सुरेखा बचत गट, गौतमी बचत गट जतवन नगर, अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले असून संगोपन करण्याची जबाबदारी माझी माँ जिजाऊ महिला मंडळ यांनी घेतलेली आहे़ तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी माँ जिजाऊ महिला बहुद्देश्य महिला मंडळातील सर्व संचालक यामध्ये संस्थापक अध्यक्ष नयना सरदार, उपाध्यक्ष प्रतिभाताई सुरवाडे, सचिव तीलोत्तमा शेगोकार, कोषाध्यक्ष सुरक्षा अंभोरे, सुरेखाताई कोकणे, रमाबाई सदाशिव, पुनम जामनिक, पूजा सुरवाडे, विजय शेगोकार सामाजिक कार्यकर्ते, राजु सरदार सर्वांनी मेहनत घेतली संस्थापक अध्यक्ष नयना सरदार यांनी आभार प्रदर्शन केले.

Connection failed: Operation not permitted