भाजपा सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी सेलचे थाटात उद्घाटन


निवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या निवारणार्थ भाजपाचा सेल सदैव तत्पर.... आ. रणधीर सावरकर
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  03 Jun 2026, 7:18 PM
   

अकोला....... सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या असतात. त्यात काही समस्या कार्यालयीन पातळीवरच्या तर काही समस्या सामाजिक स्वरूपाच्या असतात. या संपूर्ण समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व संवर्गातील व विभागातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी भाजपा सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी सेल तयार करण्यात आला असून हा सेल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे हित जोपासण्यासह त्यांच्या समस्या निवारणार्थ सदैव तत्पर राहील. अशी ग्वाही विधान परिषदेचे मुख्य प्रतोद आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी दिली आहे. 
              या भाजपा सेलचे उद्घाटन आज स्थानिक जिल्हा परिषद कर्मचारी भवनात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रचंड उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून आमदार सावरकर यांनी  ही ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अनुप भाऊ धोत्रे  तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे शहर अध्यक्ष जयंतराव मसने, छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे, भाजपा नेते राजेश लुंगे या सेलचे प्रवर्तक सुनील जानोरकर प्रदीप खाडे, राजेंद्र नेरकर, अशोक मांगुळकर व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सेवानिवृत्त अभियंता विनायकराव पांडे यांनी याप्रसंगी शंख वादन केले.
             खासदार  अनुप भाऊ धोत्रे याप्रसंगी मार्गदर्शन करताना म्हणाले की, गाव पातळी पासून तर देश पातळीपर्यंतच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्ष यशस्वी झालेला आहे. त्यामुळे या पक्षासोबत जुळलेल्या पदाधिकाऱ्यांवरही जनतेचा विश्वास बसलेला आहे. याच विश्वासास अधीन राहून  सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हितासाठी तयार करण्यात आलेला हा सेल निश्चितच चांगले काम करून सेवानिवृत्तांच्या समस्या मार्गी लावेल असा मला ठाम विश्वास आहे.
             जयंतराव मसने यांनीही आपले मनोगत व्यक्त करून या सेलच्या निर्मितीमुळे सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना एक मोठा आधार मिळालेला आहे. असे मत व्यक्त केले. प्रवर्तक सुनील जानोरकर यांनी प्रास्ताविक करून सेल निर्मितीचा हेतू विशद केला. प्रवर्तक प्रदीप खाडे यांनी आपल्या मनोगतातून सेल निर्मितीचा प्रवास कथन केला. प्रवर्तक राजेंद्र नेरकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रदीप खाडे यांनी केले.
भाजपा सेलची जिल्हा कार्यकारिणी घोषित 
                सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या भाजपा सेलची जिल्हा कार्यकारिणी याच कार्यक्रमात शहर अध्यक्ष जयंतराव मसने यांनी घोषित केली. त्यास आमदार रणधीर भाऊ सावरकर व खासदार अनुप भाऊ  धोत्रे यांनी मंजुरात दिली. या या कार्यकारिणीत भाजपा सेलचे जिल्हा संयोजक म्हणून सुनील जानोरकर यांची तर जिल्हा सहसंयोजक म्हणून प्रदीप खाडे यांची नियुक्ती करण्यात आली. राजेंद्र नेरकर यांची जिल्हा सरचिटणीस पदावर तर अशोक मांगुळकर यांची कोषाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी लवकरच घोषित करण्यात येणार असल्याची माहिती या प्रसंगी देण्यात आली.
           कार्यक्रमास सुभाष काशीद, डॉ. दिलीपराव मानकर, विठ्ठलराव जायले, दिवाकर पाटील, विनय वैराळे, डी. सी. खारोळे, अरुण गावंडे, मुरलीधर कुलट, रमेश लोहिया, केशव अढाऊ, गजानन काळे, ज्ञानेश्वर मांडेकर, दिलीप अंधारे, केशव मालोकार, मधुकर महल्ले, सुरेश महल्ले, श्रीराम खाडे, राजू पंडित, अविनाश नाकट, रवी मानकर, विलास वरोकार, मधुकर बेलूरकर, मुकुंद पवनीकर, बाबुराव अडबोल, गणेश इंगळे, प्रकाश गवळी, धनराज लाहोळे, पद्माताई वसु, वृंदा विजयकर, ज्योती ठोकेनंद, जयश्री पुराड उपाध्ये, नभु श्रीवास, मंगला बेलसरे, सलोनी पोटे, संघमित्रा देशमुख, लीला नागलकर, रागिनी वानखडे, रेखा कीर्तीकर, सुनंदा मानकर, प्रतिभा मानकर, अन्नपूर्णा अकोलकर, हितेंद्र देवाळकर, रवी साखरकर, केशवराव भाल तिलक, श्रीकृष्ण तायडे, अजित महाजन, मनोहर सरोदे, दामोदर नहाटे, वसंत पोहरे, बळवंतराव गावंडे, अनिल पांडे, नंदकुमार काळे, राजकुमार सावदेकर, अनिल मोंढे, विनायक काळे, सारंगधर काळे, राउफ पांडे, दिगंबर ठक, सुधाकर उकर्डे, निखाडे, प्रभाकर रुमाले, वैजनाथ मिटकरी, प्रा. संजय देशमुख, प्रा. संजय म्हैसने, कैलास थोरात, मनोहर कुलकर्णी, डॉ. अमित कावरे, सुनील मावळे, गजानन पिंपळकर, विजय भिवरकर, विष्णू खराटे, अरुण साखरकर, विजय देशमुख, विजय गणोजे, गजानन डोईफोडे, सुनील गुंडेकर, आर. जी. अग्रवाल, तुकाराम घिरके यांचे सह इतरही सेवानिवृत्त कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते 

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व