प्रा.राजेश पाटिल ताले यांना राज्यस्तरीय पुस्तकमित्र पुरस्कार २०२६ जाहीर
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
17 Mar 2026, 10:39 AM
वीर भगतसिंग युथ फोरम, मुंबई द्वारा दिला जाणारा यावर्षीचा मानाचा राज्यस्तरीय पुस्तकमित्र पुरस्कार:-२०२६ स्वामी विवेकानंद ग्रुप ऑर्गनायजेशन चे अध्यक्ष,राष्ट्रीय व्याख्याते प्रा.राजेश पाटिल ताले यांना जाहीर झाला.प्रा.राजेश पाटिल ताले स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशन च्या माध्यमातून गेल्या १२ वर्षांपासून गाव तिथं वाचनालय आणि शाळा तिथं ग्रंथालय या उपक्रमाअंतर्गत वाचनसंस्कृती चे संवर्धन आणि प्रचार-प्रसार चे कार्य करीत आहेत.पश्चिम विदर्भात वाचनालय चळवळीच्या क्षेत्रात स्वामी विवेकानंद ग्रुप प्रा.राजेश पाटिल ताले यांच्या नेतृत्वात उल्लेखनीय कार्य करीत आहे.ग्रुपने गेल्या १२ वर्षात पश्चिम विदर्भात जवळपास ११५ वाचनालय स्थापन केले,१ लाख च्यावर पुस्तके ग्रामीण भागातील विविध शाळांना आणि विद्यार्थ्यांना वितरित केली आहेत आणि विशेष म्हणजे अकोला जिल्ह्यातील माझोड हे गाव लोकसहभागातून पुस्तकांचे गाव बनविण्याचे कार्य सुरु आहे.वाचनध्यास या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागात विद्यार्थी आणि पालकांमध्ये वाचनाचे प्रमाणवाढविण्याकरिता स्वामी विवेकानंद ग्रुप ची संशोधन आणि विकास समिती कार्य करीत आहे.यामुळे पश्चिम विदर्भात वाचनसंस्कृती दिवसेंदिवस वाढत आहे तसेच या उपक्रमामुळे ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना चांगले माध्यम उपलब्ध झाले आहे.विशेष म्हणजे अकोला जिल्ह्यात शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात एक चांगले वातावरण तयार होण्यास मोलाची मदत होत आहे.या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन
स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायजेशनचे अध्यक्ष, राष्ट्रीय व्याख्याते प्रा.राजेश पाटील ताले यांना राज्यस्तरीय पुस्तकमित्र पुरस्कार :-२०२६जाहीर झाला आहे. गाव तिथे वाचनालय-शाळा तिथे ग्रंथालय”या संकल्पनेतून वाचन संस्कृतीचा प्रसार,विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची आवड निर्माण करणे आणि समाजप्रबोधनाचे सातत्यपूर्ण कार्याची राज्यस्तरावर घेतलेली दखल म्हणजे हा सन्मान होय. वाचन चळवळीचा दीप असाच तेजाने प्रज्वलित राहो,ज्ञानाचा प्रवास अखंड सुरू राहो असे प्रतिपादन वीर भगतसिंग युथ फोरम कडून करण्यात आले आहे.
Post Views: 3