पाटील समाज राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद व समाजासाठी दिशा देणारे : नानाभाऊ पटोले


योगायोग पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  12 Dec 2022, 5:55 PM
   

अकोला - पाटील समाजातर्फे राबविण्यात येणार्‍या वधू-वर परिचय मेळाव्यांसह इतरही उपक्रम कौतुकास्पद असून समजासाठी जनजागृती करणारे आहेत. समाजातील जागरूक नेत्यांनी केवळ मेळाव्यांपुरतेच मर्यादीत न राहता समाजातील अनिष्ठ प्रथांना संपविण्याकरीता पुढाकार घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी केले. स्थानिक मराठा सेवा संघाच्या सभागृहात आयोजीत पाटील समाजाचे वतीने काढण्यात आलेल्या योगायोग पुस्तीकेचे प्रकाशन व सत्कार कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटील समाजाचे अध्यक्ष अशोकराव अमानकर तर अतिथी म्हणून शेगांव येथील माऊली अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वरराव पाटील, अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पटोकार, दत्तात्रय नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष जगदीश मुरूमकार, मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे उपस्थित होते.
प्रारंभी अतिथींच्या हस्ते दिप प्रज्वलीत करून व राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले. नानाभाऊ पटोले यांनी आपल्या विस्तृत भाषणात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज व अन्य महापुरूषांचा अपमान करण्याची प्रवृत्ती घातक असून त्यास वेळीच पायबंद घालण्याची गरज असल्याचे सांगीतले. या महापुरुषांनी कधीच जातीयवाद पाळला नाही. सर्वच समाजासाठी त्यांनी कार्य केले. ही बाब विचारात घेवून सर्वच समाजातील महापुरूषांचा सन्मान झाला पाहीजे असेही आवाहन त्यांनी केले. ज्ञानेश्वरराव पाटील, संग्रामभैय्या गावंडे, जगदीश मुरूमकार, अशोकराव पटोकार यांचीही या प्रसंगी समयोचीत भाषणे झालीत.
या कार्यक्रमात पाटील समाजासाठी कार्य करणारे जेष्ठ नागरीक दिनकरराव सरप, रघुनाथराव खडसे, गुणवंतराव जानोरकर, माणिकराव गावंडे, नाजुकराव गावंडे, दादाराव पाटील, विनायकराव गावंडे यांचा तसेच शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणारे प्रा. भालचंद्र सुर्वे, वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करून अनेक पारितोषीके मिळवणार्‍या डॉ. अश्वीनी खडसे, अबॅकस स्पर्धेत भारतातुन 3 रा क्रमांक मिळविणारी बाल विद्यार्थीनी श्रावणी राहुल शेळके व राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत विनामुल्य पाणी पुरवठा करणारे चरणगांव येथील राजेश दादाराव देशमुख यांचाही सत्कार नानाभाऊ पटोले यांचे हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगायोग पुस्तकाचे संपादक प्रदीप खाडे यांनी, संचालन अविनाश नाकट यांनी तर आभार प्रदर्शन सुनील जानोरकर यांनी केले. वंदनाताई मोरे व रजनी महल्ले यांनी जिजाऊ वंदना सादर केली. कार्यक्रमास पाटील समाजाचे उपाध्यक्ष विनायकराव शेळके, कोषाध्यक्ष राजेन्द्र मोहोकार, प्रदीप खाडे, डॉ. दिलीप मानकर, डॉ.दिपक मोरे, डॉ. सुधीर ढोणे, डॉ.प्रशांत वानखडे, डॉ.रणजीत कोरडे, डॉ. विजय जाधव, संतोष महल्ले, प्रा. देवीदास भाकरे, वासुदेवराव कडू, सुनील जानोरकर, दिलीप काकोडे, ओम अमानकर, पाटील समाज महिला मंडळाच्या सचिव सुनिताताई मेटांगे, प्रतिभा काटे, वनमाला खडसे, वंदनाताई मोरे, रजनी महल्ले, गौरी शेळके, संदिप महल्ले, आशिष खडसे, राहुल शेळके, सुरेश गाढे, रवि साखरे, विजय बोरकर, दिपक आखरे, रामेश्वर सपकाळ, निलेश पवित्रकार, शाम कुलट, मंगेश पाथ्रीकर, शरद पांडे, सागर कावरे, अभिजीत मुळे पाटील, डॉ. निलेश पाटील, विक्रम जानोरकर, गजानन डिवरे व इतरही प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.

    Post Views:  199


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted

संपादकिय

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted