अकोल्यात राज्यस्तरीय कर्तृत्व शिखर महिला रत्न पुरस्कार २०२६ सोहळा दिमाखात संपन्न


​युवा विचारपीठ प्रतिष्ठानचा उपक्रम; ५५ महिला व १५ संस्थांचा गौरव
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  23 Apr 2026, 1:53 PM
   

​अकोला : सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अकोल्यातील 'युवा विचारपीठ प्रतिष्ठान'च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे या वर्षीही 'राज्यस्तरीय कर्तृत्व शिखर महिला रत्न पुरस्कार २०२६' सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार पद्धतीने पार पडला. स्त्रीच्या कर्तृत्वाचा यथोचित सन्मान व्हावा, या उदात्त हेतूने आयोजित या सोहळ्यात विविध क्षेत्रांत ठसा उमटविणाऱ्या ५५ कर्तृत्ववान महिला आणि १५ सामाजिक महिला संस्थांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
​प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती:
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मा. बी. चंद्रकांत रेड्डी (अप्पर पोलीस अधीक्षक, अकोला), मा. सौ. शारदा खेडकर (महापौर, अकोला), मा. सुरेशराव देवकर (संस्थापक अध्यक्ष, अदिती अर्बन), मा. संजयजी रूहाटिया (संचालक, कालुराम फूड), मा. सौ. मालती कायटे (पोलीस निरीक्षक), मा. प्राचार्य रामेश्वरजी भिसे (श्री शिवाजी कॉलेज), मा. प्रा. प्रकाश डवले, मा. कुणाल ढोमणे (व्यवस्थापक, PNG ज्वेलर्स), मा. सौ. त्रिवेणी कुणाल घोलप (RTO अधिकारी), मा. सौ. अर्चना शर्मा (समाजसेविका), मा. सौ. रश्मी दीपक खडसान, मा. सौ. ऋतुंबरा धोत्रे (मानसशास्त्रज्ञ), डॉ. प्रवीण अग्रवाल, श्री सुभाष शेगोकार (अधिकारी, सेंट्रल रेल्वे) आणि श्री मनोज देशमुख सर यांची उपस्थिती होती.
​पुरस्कार प्राप्त मान्यवर महिला:
​सामाजिक क्षेत्र: कु. चंचल पितांबरवाले, सौ. प्रांजली जयस्वाल, सौ. वर्षा पातुरे, सौ. सुलेखा गुप्ता, नाझिया खान, वृषाली चौधरी, सौ. वंदना गोमासे, सौ. सुनीता ताथोड, सौ. कल्पना उकर्डे, सौ. राणी वाकडे राठोड, देशना उपरवट, सौ. पल्लवी गणगणे, सौ. सुनीता कावले, सौ. सुनंदाताई चांदणे, सौ. प्रतिभा घोगरे, सौ. संगीताताई सुरंसे, कु. सीता भगत, कु. काजल राऊत, डॉ. मनिषा पालिवाल (पर्यावरण), सौ. दीपाली काटे (अध्यात्म), डॉ. ज्योती विंचनकर, सौ. शुभदा राठोड.
​शैक्षणिक क्षेत्र: श्रीमती मेघा देशपांडे, सौ. जया टाले, सौ. मनिषा अभ्यंकर, डॉ. सौ. प्रमिला शर्मा, सौ. माया डिवरे, सौ. विजया सरोदे, सौ. अर्चना शिंदे, सौ. शुभांगी गुल्हाने, सौ. वैशाली नेमाडे, सौ. अर्चना गव्हाळे, सौ. फरेहा सुलतान खान, सौ. संध्या कांडीलकर, सौ. प्रीती तोष्णीवाल.
​साहित्य व सांस्कृतिक: सौ. अमिता घाटोळ, सौ. कल्पना गोरले थोरात, सौ. संजीवनी काळे (साहित्य); सौ. दीप्ती अग्रवाल, सौ. पल्लवी यादगिरे वैद्य, सौ. चंदा जैस्वाल, सौ. संगीता ढोंडफाले, सौ. अर्चना रापत्रिवार, सौ. कविता वरगट, सौ. राणी ठाकूर, सौ. राजश्री शर्मा, पियाली फरताडे (कला/सांस्कृतिक).
​वैद्यकीय व आरोग्य: डॉ. सौ. श्वेता पंचोली, डॉ. शीतल तुळस्कर, डॉ. सीमा तायडे, सौ. सुरेखा जेऊघाले (योग), कु. कणक वासराणी (योगा).
​सुरक्षा व पत्रकारिता: प्रियांका बागडे, कावेरी ढाकणे (सुरक्षा रक्षक), करुणा भांडारकर (पत्रकारिता).
​विशेष सन्मान: कु. वैदिशा शेरेकर (कला), डॉ. सुजाता भटकर (पशु वैद्यकीय).
​पुरस्कार प्राप्त संस्था:
अग्रवाल महिला मंडळ, जय माऊली महिला मंडळ, जानकी वल्लभ सतसंग मंडळ, देशमुख महिला मंडळ, महेश्वरी महिला मंडळ, श्री संत गजानन महाराज महिला मंडळ, माऊली ग्रुप, प्रेरणा क्रीएटीव्ह ग्रुप, श्री गुरुदेव महिला सेवा मंडळ, शिवशक्ती महिला ग्रुप, सौ. रजनी आळे विठाई गृह उद्योग, सौ. लताबाई राठोड (बंजारा समाज ग्रुप), रविदासीया महिला मंडळ, राजस्थानी ब्राम्हण महिला मंडळ (अकोला).तसेच सन्मान सोहळ्या दरम्यान डॉ. राधा पुरी यांचे व्याख्यान तर जागर महिला ग्रुप च्या संयोजिका सौ अनिता कुलकर्णी व ग्रुप यांनी लोकसंस्कृतीचा जागर नृत्य नाटिका सादर केली तर स्टार प्रवाह छोटे उस्ताद कु. वैदिशा शेरेकर ने गीत गाऊन सर्वाना मंत्र मुग्ध केले 
​कार्यक्रमाचे नियोजन:
युवा विचारपीठ प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. निलेश ढाकरे यांनी प्रतिष्ठानच्या सामाजिक भूमिकेबद्दल व भावी उपक्रमांबद्दल माहिती दिली.तसेच कार्यक्रम प्रास्ताविक मध्ये उपाध्यक्ष सौ स्मिता अग्रवाल यांनी महिला पुरस्कार सन्मान सोहळ्याचे महत्व सांगितले, पुरस्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कोमल चिमणकर यांनी केले, तर पुरस्कार वाचन कु. सुरभी दोडके, कु. आकांक्षा गोमासे व सौ. पल्लवी पाठक यांनी केले.
​या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठानचे मुख्य समन्वयक श्री राजेश अग्रवाल, प्रकल्प प्रमुख कौशिक पाठक, गिरीधर भोंडे, डॉ. नितीन देशमुख, गजानन चिमणकर, प्रा. गणेश पोटे, ऍड. शेषराव गव्हाळे, सुदेश काळपांडे, सुरेश तायडे तसेच नियोजन समितीच्या अश्विनी ढोरे, रिमा ढाकरे, प्रीती भोंडे, सपना गव्हाळे आणि काजल वासराणी यांनी अथक परिश्रम घेतले. पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली.

    Post Views:  1


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व