मुख्याध्यापक विष्णू मोरे Star Education Award - 2023 ने सन्मानित


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  08 Dec 2023, 1:51 PM
   

पूणे - महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, ESFE यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित BKC ( MMRDA GROUND) मुंबई येथील कार्यक्रमात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक विष्णू मोरे यांना शैक्षणिक, सामाजिक व पर्यावरण कार्याबद्दल Star Education Award -2023. BEST PRINCIPAL IN SCHOOL PUNE हा पुरस्कार ESFEचे डायरेक्टर व सीईओ यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

लायन्स क्लब ऑफ पुणे आनंद, पुणे महानगरपालिका, पुणे भूगोल शिक्षक संघ, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट यांच्या तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील शिक्षण, पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

    Post Views:  192


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व