डॉ. विनय दांदळे सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार 2023 पुरस्काराने पुरस्कृत ....!


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  26 Jul 2023, 8:15 AM
   

अकोला : अकोला नगरीतील सुपरिचित साहित्यिक डॉ. विनय वसंतराव दांदळे यांना रविवार दिनांक १६ जुलै २०२३ ला जागेश्वर सभागृह , जागेश्वर विद्यालय, वाडेगाव  सभागृहात स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन, श्री जागेश्वर कोचिंग क्लासेस वाडेगाव आणि श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय यांच्या  संयुक्तविद्यमाने इयत्ता १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.कृष्णाभाऊ अंधारे(अध्यक्ष :- श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय) प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंतरराष्ट्रीय वक्ते मा.श्री.सचिन बुरघाटे( संचालक -अस्पायर द इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट, अकोला)) होते. प्रमुख पाहुणे म्हणून
मा.डॉ.परमेश्वर जुनारे ( संचालक- ए-वन हॉस्पिटल अकोला), मा.श्री.पंकज सेहगल(संचालक :- इंडेन गॅस,वाडेगाव) मा.श्री. संतोषदादा मानकर( अध्यक्ष-जागेश्वर विद्यालय वाडेगाव) मा.डॉ.श्रीकांत काळे (संचालक :- काळे हॉस्पिटल,अकोला) मा.प्रा.नितीन मानकर(संचालक :- श्री.जागेश्वर कोचिंग क्लासेस,वाडेगाव) मा.श्री.नितीन पाटिल(जिल्हाप्रमुख- युवासेना,अकोला) उपस्थित होते. या कार्यक्रमात अकोला जिल्ह्यातील इयत्ता १० व १२ वीच्या ११० गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह  देऊन  सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात अकोला जिल्ह्यातील 100 गावचे विद्यार्थी सत्काराला उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमात  सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार:-२०२३  आणि SVGO ICON AWARD-2023 चे वितरण ही करण्यात आले. ह्या कार्यक्रमात डॉ . विनय वसंतराव दांदळे यांना त्यांच्या आतापर्यंतच्या साहित्यिक, सामाजिक कार्यासाठी त्यांना स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन तर्फे सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार 2023 अस्पायरचे संचालक आंतरराष्ट्रीय वक्ते मा. सचिन बुरघाटे यांचे हस्ते सन्मानचिन्ह प्रदान मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले .
     डॉ. विनय दांदळे यांची आतापर्यंत विविध विषयांवर ३५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांच्या  अनेक पुस्तकांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत ,  दरवर्षी अनेक दिवाळी अंकात त्यांच्या कविता प्रसिध्द होतात , तसेच शब्दगंध नावाचा दिवाळी अंक ते दरवर्षी प्रसिद्ध करीत असतात , सोबतच वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी राज्यस्तरीय मराठी वाड्मय पुरस्काराचे आयोजनही करीत असतात आणि वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आतापर्यंत अनेक वाचनालयांना जवळपास पन्नास हजार रुपयांची ग्रंथसंपदा भेट स्वरूपात दिली असून प्रत्येक कार्यक्रमात मग ते लग्न , वाढदिवस असो वा सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम असो ते पुष्पगुच्छ ऐवजी ग्रंथभेट देतात , उस्मानाबाद येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांना निमंत्रितांच्या कवी सम्मेलनात आमंत्रित करण्यात आले होते  . गत ३४-३५ वर्षांपासून ते लिखाण करीत आहेत आणि विविध साहित्यिक उपक्रम ही राबवित आहेत . त्यांच्या ह्या आतापर्यंत च्या साहित्यिक प्रवासाबद्दल त्यांना  सन्मान कर्तृत्वाचा पुरस्कार २०२३ने गौरविण्यात आले आहे.

    Post Views:  298


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व