यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना दिप प्रज्वलन, पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सौरभ वाघुडे यांनी अभ्यासपूर्ण वक्तृत्वातून आवेशपूर्ण आवाहनाने समाजातील तरुणांना क्षणभंगुर मृगजळांना टाळून संघटीत शक्तीतून विधायकतेने निरोगी समाजव्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न करण्याची अपेक्षा प्रतिपादीत केली. नेहमी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार्या शिवराजे शिवभक्त मंडळाच्या उत्साही तरुणांनी ठेवलेल्या या कार्यक्रमात न्यू तापडीया नगरातील बहूसंख्य नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिषेक राशलवार, डॉ. निरज शुक्ला, ऋषिकेश राऊत, ऋषीकेश पटेल, रितेश देशमुख, रोहन आहाळे, यश राशलवार, अभिषेक पत्की, केतन मिश्रा, शुभम चोपडे व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन रोहन आहाळे तर आभार प्रदर्शन अभिषेक पत्की यांनी केले. Post Views: 295
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay