महाराष्ट्र राज्य राष्ट्रसेवा समितीच्या वतीने पद्मश्री डॉ मणिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार समारंभ


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  20 Mar 2022, 1:24 PM
   

उरुळी कांचन : मॅगसेस अवार्ड विनर पद्मश्री डॉ मणिभाई देसाई स्मरणार्थ डॉ मणिभाई देसाई प्रतिष्ठाण, एन वाय के युवक कल्याण, क्रिडा  मंत्रालय संलग्नित,व डॉ मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट, निती आयोग दिल्ली संलग्नित व आय एस ओ नामांकन प्राप्त संस्थेच्या वतीने विविध सामाजीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ह्या वेळी राज्यस्तरीय कार्यकर्ता मार्गदर्शन  मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या कार्यक्रमात सामजिक, धार्मिक, शैक्षणिक वैद्यकिय, पत्रकारिता कला, क्रीडा, अपंग सेवा, कम्युनिटी हेल्थ वर्क, कोरोना पंडेमिक वर्क, प्रवचनकार,कीर्तनकार, सांस्कृतिक कार्ये, धार्मिक क्षेत्रांतील कार्यकर्त्यांना पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा  पुरस्कार प्रदान करण्यात येईल. राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवणे, तसेच सांस्कृतीक वारसा जतन करणे, ह्यासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पुरस्कारासाठी विचार केला  जाईल. समर्पित भावनेने निष्काम कार्ये निरंतर नि:रपेक्षपणे करनाऱ्या कार्यकर्त्यानी जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे संस्थापक- अध्यक्ष डॉ मणिभाई देसाई प्रतिष्ठाण उरुळीकांचन ता हवेली, जि‌. पुणे, मोबा. 9420173442,7507039542 येथे सम्पर्क साधावा.

Connection failed: Operation not permitted