नियमित कर्ज फेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजाराचा लाभ


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  16 Mar 2022, 8:14 PM
   

मुंबई : ज्या शेतकर्‍यांनी नियमित कर्जफेड केली आहे अशा शेतकर्‍यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार नेमके कोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत याबाबतची सविस्तर माहिती बुधवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे नियमित कर्ज अदा करणार्‍या शेतकर्‍यांच्या या प्रोत्साहन रकमेचा मार्ग मोकळा झाला आहे. 
सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाची दिनाक 30 जून 2020 पर्यंत नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना सन 2018-19 मध्ये घेतलेल्या पीक कर्ज रकमेवर ही 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. ज्या शेतकर्‍यांनी 2018-19 मध्ये पीक कर्ज घेतलेले आहे पण त्यांची रक्कम ही 50 हजारापेक्षा कमी आहे त्यांना कर्जाएवढ्या रकमेची मदत केली जाणार आहे.
ठाकरे सरकारने सत्तेची स्थापना करताच कर्जमाफीची घोषणा केली होती. याच दरम्यान ज्या शेतकर्‍यांनी नियमित कर्ज अदा केले आहे त्यांना देखील 50 हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, कोरोना आणि राज्य सरकारची आर्थिक स्थिती यामुळे ही रक्कम शेतकर्‍यांना अदा केलेली नव्हती. मात्र, आता ही रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील 20 लाख शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे. याकरिता 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महिला शेतकर्‍यांना आर्थिक अनुदानात वाढ
यंदाचे वर्ष महाविकास आघाडी सरकार हे महिला शेतकरी सक्षमीकरणाठी प्रयत्न करणार आहे. आतापर्यंत महिला शेतकर्‍यांचा योजनेत 30 टक्के सहभाग होता तो वाढवून 50 टक्के पर्यंत केला जाणार आहे. त्यामुळे महिलांचे शेती व्यवसयातील योगदान वाढणार आहे. तरतुदीच्या 3 टक्के निधी आजी-माजी सैनिकांसाठी देण्यात येणार आहे.

    Post Views:  371


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व