Buldana : पिंपळगाव सोनारा येथील पती पत्नी सोनोग्राफी साठी चिखली येथे जात असताना भानखेड फाट्यावर जेसीबी कारच्या भीषण अपघातात गर्भवती महिला ठार झाल्याची घटना 11 मार्चच्या सकाळी 11 वाजता घडली.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, पिंपळगाव सोनारा येथील निकिता निलेश वायाळ वय 20 हिला सोनोग्राफी साठी पती निलेश गुलाबराव वायाळ हे एम एच 28-ए. बी. 2668 क्रमांकाच्या कारने चिखली येथे जात असताना चिखली देऊळगाव राजा रोडवर भानखेड फाट्यावर जेसीबीचे फावडे फिरल्याने अपघात झाला.यात कारमध्ये बसलेल्या निकिताच्या मेंदूचा अक्षरशः सडा पडला. दरम्यान पती निलेश आणि चालक या अपघातात बचावले असून तातडीने निकिताला उपचारार्थ चिखली येथे हलविण्यात आले मात्र निकिताचे ब्रेनडेड झाल्याने पोटातले बाळ तरी वाचले पाहिजे म्हणून तेथून औरंगाबाद येथे महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल मध्ये हलविले. तेथे डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करूनही बाळ वाचविण्यास अपयश आले. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून गतवर्षीच निकिताचा विवाह झाला होता. दरम्यान पोलीसांनी जेसीबी चालकावर गुन्हा दाखल केला असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता.
Post Views: 462