कोरोना काळातील पाणी पट्टी कमी करा निलेश देव मित्र मंडळाचे स्वाक्षरी अभियानास उत्स्पुâर्त प्रतिसाद
अकोला : - महानगरपालिकेच्या वतीने शहरात सध्या पाणी पट्टी चे बिल वाटप सुरू असून अवाच्या सव्वा बिलाने नागरीक त्रस्त आहे. दोन वर्षापासून कोरोना संकट आहे. अशा परिस्थितीत पाणी पट्टी कमी करत अकोलेकर नागरीकांना दिलासा द्या अशी मागणी निलेश देव मित्र मंडळाने केली आहे. आज स्व. महादेवराव राऊत स्मृती राऊतवाडी चौकात या विषयावर स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या अभियानाचे आयोजन निलेश देव मित्र मंडळामार्पâत करण्यात आले होते. या अभियानात निलेश देव,नगरसेवक बबलु जगताप, जिल्हा परिषद सदस्य राम गव्हाणकर , दिलीपकाका देशपांडे, डॉ. राजकुमार रंगारी,दिवाकर गवई,राजुभाऊ गुणलवार, भास्करराव बैतवाल, चिंटु सूर्यवंशी, ललन मिश्रा, बबलु तिवारी,निलेश पवार, कीसन यादव, सोनु मोटे ,गौरव जगतात,योगेश भाटीसुधीर मस्के, राजभाऊ कनोजिया,सौ.रश्मी शैलेश देव आदींनी प्रमुख सहभाग नोंदविला.
पाणी पट्टीचे बिल देण्याचे काम महानगरपालिके द्वारे सुरू आहे. सामान्य अकोलेकर अजून ही कोरोनातून बाहेर निघालेला नाही ,तरी सुध्दा आज रोजी अकोलेकर नियमितपणे मालमत्ता कर भरत आहेत, मनपा प्रशासनाचा चुकीच्या नियोजनमुळे या मागील दोन वर्षीतील पाणीपट्टी ची देयके सामान्य अकोलेकरांवर प्रलंबित आहेत. या विषयावर धोरणात्मक योग्य तो निर्णय घेत नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी निलेश देव मित्र मंडळातर्पेâ करण्यात आली आहे. सोमवारी महापौर व आयुक्तांना या विषयी हजारो लोकांच्या सह्यांचे निवेदन देत दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
यापुर्वी सन २०१६ - १७ पूर्वी जसे सामान्य अकोलेकरांना पाणी पट्टी चे देयके मालमत्ता करासोबत देण्याची पध्दत होती. एक काम स्थापत्य कंपनी यांना मालमत्ता कर मोजणी व देयके वितरणाचे काम देण्यात आले व शासनाच्या परवानगी शिवाय सदर काम करुन सामान्य अकोलेकरानवर अवाजवी कर वाढ लादण्यात आली,त्याच वेळेस अकोल्यातील नळ धारकांना सांगण्यात आले की नियमीतपणे पाणीपुरवठा होईल तुम्ही स्वतः च्या.पैशाने आप आपल्या घरच्या नळाना मिटर लावा. तसे नागरीकांनी केले पण, अनेकांची आता लुट सुरु झाली आहे.
ज्याच्या कडे घरगुती कनेक्शन आहे त्यांना व्यावसायिक देयके येण सुरु झाले,तर ज्याच्या घरी आयुष्यात कधीच नळाचे कलेक्शन नव्हते त्यांना सुध्दा नळाचे देयके येण सुरु याबाबत मनपा प्रशासनास दिले. दोन वर्षीत जर मालमत्ता कराचा बिला सोबतच पाणीपट्टी चे देयके सोबत दिली असती तर अकोलेकरांनी देयके अदा केले नसते, कोवीड १९ पासुनचे पाणीपट्टी चे देयके प्रलंबीत आहे पण साधारण यादोन वर्षीची देयकेच वाटप न झालाने ती प्रलंबीत राहिली आहेत. कोवीड च्या काळात काळजी घ्या आनलाईन देयके अदा करा व ऐका बाजुला देयकामधील चुका दुरुस्तीसाठी गर्दी करायला सांगते एंकदरी अनियोजित कारभार झाला आहे. आज स्व. महादेवराव राऊत चौक राऊत वाडी येथे स्वाक्षरी अभियान चे आयोजन करण्यात आले होते. त्यास असून नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा अशी विनंती निलेश देव मित्रमंडळा द्वारे करण्यात आले होते.
Post Views: 266