हवेची पण एक गंमत असते ना...


 संजय देशमुख  04 Dec 2021, 11:37 AM
   

चाकातून गेले की                                                             
गाडी थांबते चालत नाही
आणि डोक्यातून गेली की
चांगला वाईट कळत नाही
हवेची पण एक गंमत असते ना,
कोणत्याही दिशेने आली की
ती कोठेच थांबत नाही
थांबली की वादळ निर्माण
केल्याशिवाय राहत नाही
हवेची पण एक गंमत असते ना,
जवळ नसली की
मनाला हवीहवीशी वाटते
जादाच लाडवली की
वादळ निर्माण करून जाते
हवेची पण एक गंमत असते ना,
नाचत नाचत आली की
कचरा सोबत घेऊन जाते
धावत धावत आली की
 फार नुकसान करून जाते
हवेची पण एक गंमत असते ना,
नाही आली की
जीव कासावीस करते
आणि आली की थांबत नाही    
ती  निघून जाते
हवेची पण एक गंमत असते ना,.   
नंदकिशोर थुटे, अकोला

    Post Views:  339


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

संपादकिय

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted